लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: घोडबंदर रोड येथे स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाºया टोळीतील मोहम्मद जुनेद हबीबउल्ला शाह (२८, रा. गोंडा, उत्तरप्रदेश, हल्ली रा. अंधेरी, मुंबई) या ‘मॅनेजर’ला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. त्याच्या तावडीतून चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे.घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथील सेवा रस्त्यावर असलेल्या ‘द बायके सूरज प्लाझा’ या हॉटेलमधील ‘इलिगंट स्पा अॅन्ड सलून’ मध्ये स्पाच्या नावाखाली काही तरुणींकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग, सहायक पोलीस निरीक्षक शीतल मदने, उपनिरीक्षक सुनिल चव्हाणके, जमादार राजू महाले आणि पोलीस हवालदार अविनाश बाबरेकर आदींच्या पथकाने हॉटेलच्या सातव्या मजल्यावरील या स्पामध्ये मंगळवारी सायंकाळी ५ ते ७ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या पथकाने बनावट गिºहाईक पाठवून या प्रकाराची खात्री केली. तेंव्हा तिथे मागणीनुसार शरीर विक्रयासाठी मुली पुरविण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. तेंव्हा या गिºहाईकाने इशारा केल्यानंतर पोलिसांनी याठिकाणी धाडसत्र राबविले. या कारवाईमध्ये स्पा चालविणारा मोहम्मद जुनेद हबीबउल्ला शाह या मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या तावडीतून या चार मुलींची सुटकाही करण्यात आली आहे. शाह याच्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यात स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या टोळीतील ‘मॅनेजर’ला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 12:45 AM
स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाºया टोळीतील मोहम्मद जुनेद हबीबउल्ला शाह (२८) या ‘मॅनेजर’ला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. त्याच्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाई चार तरुणींची सुटका