- अजित मांडके ठाणे - नवी मुंबई ते ठाणे आणि ठाणे ते मीरा-भाईंदर असा ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात वाहतूककोंडी, पार्किंग, हक्काचे धरण नसल्याने पाणीटंचाईसह विविध समस्या दीर्घकाळ सुटलेल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ठाणेकरांच्या या समस्यांची चर्चा व्हावी व उमेदवारांनी या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मतदारांची अपेक्षा आहे.
बाह्यवळण रस्ता १५ वर्षे कागदावरच विविध भागांत सकाळी व सायंकाळी ठाणेकर अर्धा ते एक तास कोंडीत अडकतात. वाहनांचे पार्किंग ही गंभीर समस्या आहे. जुन्या ठाण्याचा पुनर्विकास, वाहतूककोंडी फोडण्यासाठी घोडबंदर बाह्यवळण रस्त्याला मुहूर्त लाभलेला नाही. मागील १२ ते १५ वर्षांपासून या रस्त्याचे कागदी घोडे नाचविले जात आहेत. हा कोस्टल रोड १३ किमीचा आहे; तसेच तो ४० ते ४५ मीटर रुंद असणार आहे. या कामासाठी आता २,६७४ कोटींचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. खारेगाव ते गायमुख असा हा मार्ग आहे.
क्लस्टर प्रत्यक्षात केव्हा? अनधिकृत, धोकादायक इमारतींत राहणाऱ्या रहिवाशांसाठी क्लस्टर योजना पुढे आणली. ठाणे महापालिका हद्दीत क्लस्टरचे ४४ यूआरपी नियोजित करण्यात आले. त्यातील पाच यूआरपीचे नकाशे अंतिम करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते किसननगर भागातील पहिल्या क्लस्टरचे भूमिपूजन झाले. १९९ झोपडपट्ट्यांपैकी ११२ झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी महापालिकेने क्लस्टर योजना राबविण्याचे निश्चित केले. किसननगर भागातील क्लस्टरचे वारंवार भूमिपूजन झाले. आता कुठे योजनेचे काम सुरू झाले आहे. केवळ एका क्लस्टरने ठाण्यातील सर्व क्लस्टरचा मार्ग प्रशस्त होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
मेट्रोचे काम रखडलेवडाळा ते कासारवडवली या मेट्रो चारचे काम कित्येक वर्षांपासून सुरू आहे. त्याचा फटका घोडबंदरवासीयांना बसत आहे. मेट्रोचे काम पूर्ण होण्यासाठी डिसेंबर २०२५ डेडलाइन आहे. मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. नवीन ठाणे स्टेशन १४ वर्षे लटकलेसध्याच्या ठाणे स्टेशनवरील वाढती गर्दी पाहता ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नवीन ठाणे स्टेशनचा पर्याय आहे. मागील १४ वर्षांपासून या स्टेशनचा विकास होत आहे; परंतु अद्यापही ते स्टेशन होऊ शकले नाही. ठाणे स्टेशनवरील ताण कमी होण्यास आणखी दोन ते तीन वर्षांचा कालावधी जाऊ शकतो.हक्काचे धरण नाहीचठाणे जिल्ह्याचा भाग असलेल्या नवी मुंबई शहराच्या महापालिकेला हक्काचे धरण आहे. मीरा-भाईंदरला सूर्या प्रकल्पातून पाणी मिळणार आहे; परंतु ठाण्याची लोकसंख्या वाढत असताना हक्काचे धरण मिळू शकले नाही. कधी काळू तर कधी शाही धरणाची चर्चा होते, मात्र, अद्यापही धरण उभारणीत प्रगती नाही.जुन्या ठाण्याच्या विकासाला ब्रेकजुन्या ठाण्यात आजही अनेक धोकादायक इमारती उभ्या आहेत; परंतु त्यांच्या पुनर्विकासात अनंत अडचणी आहेत. येथील इमारतींचा पुनर्विकास व्हावा, या उद्देशाने राज्य शासनाने नवीन ‘यूडीपीसीआर’ आणला खरा, मात्र त्यात अनेक त्रुटी असल्यामुळे हजारो रहिवासी आजही आपला जीव मुठीत घेऊन धोकादायक इमारतीत वास्तव्य करीत आहेत.