शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी रस्त्याची प्रचंड दुरावस्था; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

By नितीन पंडित | Published: September 13, 2022 5:34 PM

भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. 

भिवंडी : भिवंडीतील माणकोली अंजुरफाटा ते चिंचोटी या महामार्गाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर मालोडी येथील टोल नाक्यावर अवजड वाहनांवरून मोठ्या प्रमाणात टोल वसुली होत असतांनाही मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मात्र या दुरावस्थेकडे टोल कंपनीसह भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी व रस्त्याची देखभाल दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी स्थानिक नागरिक व प्रवासी करीत आहेत. 

मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी हा महामार्ग सुमारे २८ किलोमीटरचा असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात गोदामपट्टा असल्याने वसई विरार ते अहमदाबाद गुजरात पासून ते पुढच्या राज्यातील अवजड वाहने आपल्या मालाची ने आण याच रस्त्याने करतात त्यामुळे य मार्गावर अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. त्यातच या अवजड वाहनांकडून मालोडी येथील टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात टोल वसुली करण्यात येते. मात्र रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे कोणतेही लक्ष या टोल कंपनीचे नसल्याने व या कंपनीवर भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कोणताही वचक नसल्याने हा रस्ता प्रचंड नादुरुस्त झाला आहे.

बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा या रस्त्यावर मानकोली, वळगाव, अंजुरफाटा, बहात्तर गाळा ,कालवार, वडघर, खारबाव मालोडी ते पुढे कामण चिंचोटी पर्यंत या रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून या मार्गावर अपघातांचे सत्र देखील मोठ्या प्रमाणात सुरु असते. या रस्त्यावर एखाद्या वाहनाचा जेव्हा एखादा अपघात होतो त्या वेळेस टोल कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी रस्ता दुरुस्तीचा कांगावा करत असतात. मात्र रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस उपाय योजना राबवत नसल्याने हा मार्ग देखील मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बनविलेल्या रस्त्याची त्रयस्थ यंत्रणेकडून पाहणी करण्यात यावी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी सध्या या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबरच स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाroad transportरस्ते वाहतूक