युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीत अखेर मनोज शिंदे गटाची हार तर पूर्णेकर गटाने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 05:40 PM2018-09-14T17:40:57+5:302018-09-14T17:45:17+5:30

अपेक्षेप्रमाणे युवक कॉंग्रेसची निवडणुक प्रक्रिया पार पडली असून या निवडणुकीत शहर अध्यक्ष मनोज शिंदे गटाची हार झाली आहे. तर जवळ जवळ सर्वच जागांवर स्वर्गीय बाळकृष्ण पूर्णेकर गटाने बाजी मारली आहे. युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी मो. झीया शेख यांनी बाजी मारली.

Manoj Shinde lost the team after the Youth Congress elections, and Puranakar group lost the match | युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीत अखेर मनोज शिंदे गटाची हार तर पूर्णेकर गटाने मारली बाजी

युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीत अखेर मनोज शिंदे गटाची हार तर पूर्णेकर गटाने मारली बाजी

Next
ठळक मुद्देशिंदे गटाला केवळ कोपरी पाचपाखाडीवर समाधानमो. झिया शेख यांना १६६० मते

ठाणे - अखिल भारतीय युवक काँग्रेसच्याठाणे जिल्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर शहर अध्यक्ष मनोज शिंदे गटाची हार झाली आहे. स्वर्गीय बाळकृष्ण पूर्णेकर गटाने या निवडणुकीत बाजी मारली आहे. त्यानुसार युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी झिया शेख यांनी बाजी मारली आहे. तर त्यांच्या विरोधात उभे असलेले मनोज शिंदे समर्थक सबप्रीत बिंद्रा यांचा पराभव झाला आहे.

                  युवक कॉंग्रेसची संघटनात्मक निवडणूक संपूर्ण राज्यात घेण्यात आली होती. ठाण्यातही या निवडणूका मागील आठवड्यात पार पडल्या. या निवडणूकीत ठाण्यातील पाच विधानसभा क्षेत्र मिळून एक जिल्हाध्यक्ष व पाच विधानसभा अध्यक्ष तसेच जिल्हास्तरीय पदाधिकारीऱ्यांसह प्रदेशअध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस यांच्याकरीता मतदानाची प्रकिया पार पडली. ठाण्याची ही निवडणुक प्रथमच प्रतिष्ठेची मानली गेली होती. त्याचे कारणही तसेच होते, या निवडणुकीत मनोज शिंदे गट आणि स्वर्गीय बाळकृष्ण पूर्णेकर यांना मानणाऱ्या गटाचे प्रतिनिधी एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यामुळे यात कोण बाजी मारणार याची चर्चा शहरभर रंगली होती. अखेर मनोज शिंदे गटाचा यात पराभव झाला आहे.
या निवडणूकीचा निकाल शुक्रवारी नागपूर येथून जाहीर करण्यात आला असून जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मो.झिया शेख यांनी बाजी मारली असून त्यांनी १६६० मते घेऊन विजय मिळवला. तर सबरप्रीत बिंद्रा यांना ११८४ मते पडली. ठाणे शहर विधानसभा अध्यक्षपदी स्वप्नील भोईर, ओवळा-माजीवडा विधानसभा अध्यक्षपदी महेश म्हात्रे, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा अध्यक्षपदी दिपक पाठक (मनोज शिंदे समर्थक) तर कळवा-मुंब्रा विधानसभा अध्यक्षपदी वसीम हजरत व मीरा-भाईंदर मतदार संघात रियाज सय्यद यांनी या निवडणूकीत विजय मिळवला तर जिल्हा उपाध्यक्षपदी महिला आरक्षण मध्ये सोनलक्ष्मी घाग व एसी आरक्षण मध्ये किशोर कांबळे निवडून आले. जिल्हा सरचिटणीपदी खुल्या गटातून रोशन पाटील, मयांक गुप्ता, जयेश पाटील, सचिन जैन व मेहेर चौपाणे तर एस.सी.आरक्षणात विशाल वाघ व ओबीसी आरक्षणात तेजस घोलप यांनी बाजी मारली.

Web Title: Manoj Shinde lost the team after the Youth Congress elections, and Puranakar group lost the match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.