शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

मानपाडा स्मशानभूमीवरून शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 2:12 AM

प्रशासन आणि शिवसेनेतील वादावर पडदा पडण्याची चिन्हे असताना शिवसेनेच्या दोन गटातील वाद चव्हाट्यावर आहेत. घोडबंदर भागातील मानपाडा येथील नियोजित स्मशानभूमीवरून शिवसेनेतील

ठाणे : प्रशासन आणि शिवसेनेतील वादावर पडदा पडण्याची चिन्हे असताना शिवसेनेच्या दोन गटातील वाद चव्हाट्यावर आहेत. घोडबंदर भागातील मानपाडा येथील नियोजित स्मशानभूमीवरून शिवसेनेतील दोन गटातील कलह वाढला आहे. आमदार प्रताप सरनाईक हे या स्मशानभूमीसाठी आग्रही झाल्याने शिवसेनेतील दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.ठाणे पालिकेने २० वर्षांपूर्वी तयार केलेल्या विकास आराखड्यात स्मशानभूमीसाठी जागेचे आरक्षण नाही. त्यामुळे नव्या ठाण्यात हा प्रश्न गहन बनला असून घोडबंदरच्या एका टोकावर राहणाऱ्या कुटुंबांना अंत्यविधीसाठी थेट ठाणे शहरातील जव्हार बाग अथवा वागळे इस्टेट भागात यावे लागत असल्याकडे सरनाईक यांनी लक्ष वेधले. टिकुजीनीवाडीतील निसर्ग उद्यानाच्या सुविधा भूखंडावर स्माशानभूमी उभारावी, अशी माझी मागणी होती. मात्र, कल्पतरू बिल्डरचा विरोध असल्याने हा प्रस्ताव पालिकेतील काही अधिकाºयांनी पूर्णत्त्वास न नेता मुल्लाबाग येथे नवे आरक्षण टाकले. निसर्ग उद्याानाच्या मागच्या बाजूस संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असून हा भाग एकप्रकारे एका कोपºयात आहे. असे असताना केवळ बिल्डरच्या हितासाठी तेथे स्मशानभूमी होऊ न देण्यासाठी कोणी किती प्रयत्न केले हे मला माहीत आहे. ही नावे मी उघड केल्यास ठाण्यात खळबळ उडेल, असा इशाराही सरनाईक यांनी दिला. वन विभागाच्या जागेतील रामबाग स्मशानभूमीसाठी वनमंत्र्यांसोबत बैठका झाल्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे रामबाग स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता करणे शक्य नसल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले. त्यानंतर महापालिकेकडे दुसºया ठिकाणी स्मशानभूमीची मागणी केली.यासाठी कोणतीही जागा निश्चित करण्याची मागणी होती. मात्र, विशिष्ठ ठराविक जागांसाठी माझा कधीच आग्रह नव्हता. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. परंतु, तरीदेखील दोस्ती आणि रेप्टाकॉसच्या जागा मी सुचिवल्याचे चित्र उभे करण्यात आले. त्याचप्रमाणे कॉसमॉस लाऊंजच्या परिसरात मंजूर केलेल्या स्मशानभूमीच्या बाबतीतही घडत आहे, असेही त्यांनी सांगितले. टिकुजीनीवाडी भागात स्मशानभूमीसाठी आग्रही होतो. मात्र, तेथील खेळाच्या मैदानावर ती करणे शक्य नसल्याने पालिकेने त्यास नकार दिला. त्यामुळे मानपाडा येथे निसर्ग उद्याानासाठी प्रस्तावित जागेवर ती उभारण्याची मागणी केली होती. परंतु, या जागेजवळ कल्पतरू विकासकाचा गृहप्रकल्प सुरू असल्याने त्याचा त्यास विरोध होता. त्यामुळेच पालिकेने ही जागा बदलून त्याऐवजी कॉसमॉस लाऊंज परिसरातील जागेची निवड करून तसा प्रस्ताव तयार केला. तो प्रस्ताव मंजूरही झाला आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.