डोंबिवली : शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या मानपाडा रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी मानपाडा रस्त्याच्या रुंदीकरणात किती मालमत्ता बाधित होत आहेत, याची माहिती घेऊन वस्तुस्थिती अहवाल तयार करण्याच्या सूचना अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी सुनील जोशी यांना मंगळवारी दिल्या. तसेच मानपाडा रोडवरील साईबाबा मंदिराजवळ पीएनटी कॉलनीच्या दिशेने भुयारी मार्गाबाबतही प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.आमदार सुभाष भोईल यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत आयुक्तांशी प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी कोळेगाव व्यायामशाळा आणि आजूबाजूची जागा संस्थेला नाममात्र भाड्याने देण्यासंदर्भात तातडीने ठराव मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.घेसर, आडिवली ढोकळी, मानपाडा या स्मशानभूमीसह संपूर्ण २७ गावांतील स्मशानभूमींची दुरुस्ती करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. युनियन बँक ते रविकिरण सोसायटीपर्यंतच्या रस्त्याचे तातडीने सीमांकन करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. तसेच आयरे गावातील स्मशानभूमीकडे जाणाºया रस्त्याचा डब्लूबीएम प्रस्ताव तयार करण्याचा सूचना केल्या आहेत. २७ गावांसाठी अग्निशमन केंद्रासंदर्भात लोढा येथील अग्निशमन केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेला कर्मचारी तसेच साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहेत.या बैठकीला उपतालुकाप्रमुख बंडू पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश म्हात्रे, माजी सरपंच रवी म्हात्रे, तालुका युवा अधिकारी योगेश म्हात्रे, नगररचना विभागाचे अधिकारी सुरेंद्र टेंगळे, कार्यकारी अभियंता सुभाष पाटील, पाणीपुरवठा उपअभियंते आदी उपस्थित होते. दरम्यान, बैठकीत नवीन टाकलेल्या जलवाहिन्यांचे बिल अद्याप ठेकेदारांना मिळालेले नसल्याबाबत भोईर यांनी खंत व्यक्त केली.>आयुक्त डोंबिवलीत ऐकणार समस्यापत्रीपूल पाडण्यात आल्याने नागरिकांना कल्याणमध्ये मुख्यालयात जाताना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महिन्यातून किंवा पंधरवड्यातून एक दिवस आयुक्तांनी डोंबिवली येथील विभागीय कार्यालयात बसावे, अशी सूचना भोईर यांनी करताच त्याला आयुक्तांनी होकार देत सर्व अधिकारीही उपस्थित असतील, असे स्पष्ट केले.भोईर यांनी प्रभाग क्र. ११३, ११४ व ११५ या प्रभागात अद्याप कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याकडेही आयुक्तांचे लक्ष वेधले.
मानपाडा रस्तारुंदीकरण लवकरच लागणार मार्गी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 1:54 AM