ठाणे : येऊरमध्ये उघड्याबोडक्या असलेल्या माळरानाला हिरवेगार करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून ५३ वृक्षांचे रोपण करण्यात आले. त्यामुळे या परिसरातील मोकळे माळरान डेरेदार झाडांनी बहरणार आहे.
ताम्हण, वड, आकाशनिम, जांभूळ, शिसव आणि पिंपळ या झाडांची रोपे येऊरच्या माळरानावर लावण्यात आली. मनविसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी उपशहर अध्यक्ष संदीप चव्हाण, प्रमोद पत्ताडे, दीपक जाधव, सचिव सचिन सरोदे, विधानसभा सचिव मयूर तळेकर, विभागअध्यक्ष राकेश आंग्रे, हेमंत मोरे, कृष्णा पोळ, विवेक भंडारे, नीलेश वैती व इतर उपस्थित होते.
*झाडांना लाकडी कुंपणाचे कवच*
वन्यजिवांकडून ही झाडे खाल्ली जाऊ नयेत अथवा त्यांना हानी पोहोचू नये म्हणून या झाडांभोवती लाकडी कुंपणही लावण्यात आले. येत्या वर्षभर या झाडांची निगा रूद्र, शिवशांती प्रतिष्ठान संस्था घेणार असल्याची माहिती यावेळी पाचंगे यांनी दिली.
----------