शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

शहापूर तालुक्यात अनेक जण घरांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 4:01 AM

पंतप्रधान आवास योजना : दारिद्रयरेषेचे सर्वेक्षण चुकीचे असल्याचा बसला फटका

भातसानगर : शहापूर तालुक्यात आजही अनेक कुटुंबे पंतप्रधान आवास योजनेच्या प्रतीक्षेत असून केवळ दारिद्र्यरेषेचा सर्व्हे चुकीचा असल्याचा फटका अनेक लाभार्थ्यांना बसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून तालुक्यात शेकडो घरकुले तयार झाल्याचे पुढे आले असले, तरी प्रत्यक्षात मात्र ज्यांना त्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे, त्यांना तो आजही मिळत नसल्याचे दिसते आहे.

तालुक्यात आदिवासींप्रमाणेच कातकरी या आदिम जमातीला त्याचा अधिक लाभ मिळणे आवश्यक असतानाही तो मिळत नसल्याचे दिसते आहे. ठाणे जिल्ह्यात तसेच खासकरून शहापूर तालुक्यात ही जमात अधिक संख्येने राहते. मात्र, त्या जमातीला हवा तितका लाभ मिळाला नाही. त्यांच्याबरोबर इतर दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ होणे गरजेचे आहे. ही एक प्रकारची भटकी जमात असून यावर्षी या गावात तर पुढील वर्षी दुसऱ्या गावी, उन्हाळ्याच्या दिवसांत कामानिमित्त आठ महिने वीटधंद्यावर गुजराण सुरू असते. त्यामुळेच अनेक शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही.

२०१५-१६ मध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ६८४ घरकुले मंजूर करण्यात आली. त्यापैकी ६५९ पूर्ण करण्यात आली. त्यासाठी सहा कोटी २६ लाख पाच हजार रु पयांचे वाटप करण्यात आले. तर, २०१६-१७ मध्ये १२४१ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ११४१ पूर्ण झाली. यासाठी १३ कोटी ६९ लाख २० हजार रुपयांचे वाटप केले. २०१७-१८ मध्ये ३८९ घरकुलांना मंजुरी मिळाली, त्यातील २७९ घरे पूर्ण झाली. यासाठी ३३ लाख ४८ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. २०१८-१९ मध्ये २४३ घरकुले मंजूर झाली असून अद्याप एकही पूर्ण झालेले नाही. यासाठी सहा लाख ७५ हजार रु पयांचे वाटपदेखील करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार २०१६ ते १९ पर्यंत १८७३ एवढ्या घरांचा उद्देश पूर्ण केला असून ९२७ शिल्लक असल्याची माहिती कार्यालयाकडून मिळाली आहे. २०११ च्या सर्वेक्षणानुसार सात हजार लाभार्थी पात्र ठरले होते. त्यानुसार, क्षेत्रीय पाहणी करून २८०० चे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.तालुक्यातील क्षेत्रीय सर्व्हेनुसार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून उर्वरित लाभार्थ्यांना त्याचा लवकरात लवकर लाभ देण्याचा प्रयत्न असेल. - सुशांत पाटील, सहा. गटविकास अधिकारी

आदिवासी तसेच कातकरी या आदिम जमातींना कोणतेही निकष न लावता पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे. खरेतर, करण्यात आलेला दारिद्र्यरेषेचा सर्व्हे चुकीचा आहे. ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला, त्यांची माहिती मी घेणार आहे. खरे लाभार्थी मात्र यापासून वंचित राहिले आहेत.- पांडुरंग बरोरा, आमदार

टॅग्स :thaneठाणेPMRDAपीएमआरडीएHomeघर