शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

स्मार्ट शहरातील दिव्यात छळछावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 12:30 AM

एकेकाळी रेल्वेशिवाय रस्ता नसलेले दिवागाव, ज्याला स्टेशन दिवा म्हणून ओळखले जायचे, ती ओळख आता काही वर्षांत नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

- अजित मांडकेठाणे महानगरपालिकेचा एक भाग असलेल्या मात्र विकासापासून आजही कोसो दूर असलेल्या दिवा या गावातील लोकांची आजची अवस्था वर्णन करण्यास ‘नरकयातना’ याखेरीज दुसरा शब्द नाही. अनधिकृत बांधकामांचे शहर म्हणून ओळख असलेल्या दिव्यात कुठली समस्या नाही, असाच प्रश्न करायला हवा. आरोग्य, डम्पिंग ग्राउंड, वाहतूककोंडी, खराब रस्ते, उघडी गटारे, पायवाटांची बजबजपुरी, मलनि:सारण व्यवस्थेचा अभाव अशी समस्यांची यादी बरीच मोठी आहे. विजेची समस्या तर आहेच, पण पिण्याच्या पाण्यासाठीसुद्धा येथील पाच लाख लोकसंख्येला तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकीकडे ठाण्याच्या स्मार्ट सिटीचे ढोल पिटले जात असताना दिव्यातील लक्षावधी रहिवासी मूलभूत गरजांपासून कोसो दूर आहेत. दिव्याला सापत्न वागणूक दिली जात आहे.एकेकाळी रेल्वेशिवाय रस्ता नसलेले दिवागाव, ज्याला स्टेशन दिवा म्हणून ओळखले जायचे, ती ओळख आता काही वर्षांत नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कोणीही यावं आणि टिकली मारून जावे, अशी अवस्था दिवा गावाची झाली आहे. ठाणे-कळव्यात घर घेणे आवाक्याबाहेर झाले आहे. डोंबिवली-कल्याण किंवा अंबरनाथ-बदलापूरला जायचे म्हणजे दूरवर उपनगरांत फेकलो गेल्याची भावना होते. अशा परिस्थितीत मुंबई सोडणाऱ्यांना निवा-यासाठी दिव्याने दिवा दाखवला. स्वस्तात घरे मिळतात, यामुळे गेल्या सातआठ वर्षांत दिव्यात लोकवस्ती वाढली. कुठल्याही परिणामांची चिंता न करता अनधिकृत चाळी व अनधिकृत इमारतींचा विळखा दिव्याला बसला आहे. दिव्यात गुंड राजकीय नेत्यांच्या टोळ्या बेकायदा इमले बांधत असताना स्मार्ट सिटीच्या तोंड फाटेस्तोवर गप्पा मारणारे बोलघेवडे नोकरशहा डोळ्यांवर पट्टी बांधून शांत बसले होते. खाडीतील मॅनग्रोव्हज जाळून होणारी अनिर्बंध भरणी, त्यावर रातोरात उभ्या केल्या जाणाºया इमारती आणि संपूर्ण ठाणे शहराचा येणारा कचरा यामुळे दिव्याची अवस्था गटारांपेक्षा भयंकर झाली आहे. किंबहुना, घरात जसा दिवाणखाना असतो, तसेच संडास असते. त्याप्रमाणे ठाणे शहर हा दिवाणखाना असेल, तर दिवा हे संडास असल्याची विभागणी प्रशासनाने केली आहे. इथे चालायलाही धड रस्ता नाही. पाणी वाहून नेणारे एकही गटार नाही किंवा चांगल्या अवस्थेतील नाला नाही. दिव्यातील लोकांनी स्वत:ला ठाणे शहरातील भाग का मानावे, असा प्रश्न त्यांना पडतो. फक्त नकाशापुरता तो ठाणे महापालिकेचा भाग आहे. हिटलरने ज्यूंना ठार करण्याकरिता तयार केलेल्या छळछावण्यांमध्येसुद्धा कदाचित बरी परिस्थिती असेल, इतकी भीषण अवस्था येथे आहे.दिव्याची भौगोलिक परिस्थिती पाहता समोर भिवंडी, अलिमघर, खारबाव आहे. एकीकडे मुंब्रा आणि कौसा आहे. त्यामुळे जणूकाही दिवा हे एका बेटासारखे आहे. या ठिकाणी साबे, दातिवली, बेतवडे, म्हातार्डी, आगासन अशी गावे आहेत. तिन्ही बाजूंना असलेल्या खाडीतील पाणी आत घुसल्याचा परिणाम येथील लोकांच्या जीवनावर झाला. या जमिनीमध्ये नैसर्गिक दलदल आहे. अशा या जमिनीवर उभ्या राहिलेल्या इमारती दुर्दैवाने एखादा मध्यम स्वरूपाचा भूकंप झाला तरी पत्त्यासारख्या कोसळून किमान लाखभर लोकांचा जीव जाईल. २६ जुलै २००५ रोजी दिव्यात भीषण परिस्थिती होती. त्यावेळी इमारती उभ्या राहायला सुरुवात झाली होती. मोजकेच लोक दिव्यात वास्तव्य करत होते. त्यांचे अतोनात नुकसान झाले होते. मागील आठवड्यातील जलप्रलय २००५ च्या तुलनेत केवळ इशारा देणारा होता. त्यातूनही आपण काहीच शिकलो नाही, तर मोठा जलप्रलय दिवा बुडवून टाकेल. दिव्यात नियुक्त महापालिकेचे अधिकारी फक्त अनधिकृत बांधकामांच्या उभारणीला साहाय्य करून किती मलिदा मिळेल, यावर डोळा ठेवणारे आहेत, असा रहिवाशांचाच उघड आरोप आहे. इथल्या अर्ध्याअधिक बालकांना फुफ्फुसाच्या रोगाची लागण झालेली आहे. कारण, ठाणेकरांचा कचरा त्यांच्या दारात आणून टाकला जातो. इथल्या काही स्थानिकांनी आपल्या जमिनी कचरा टाकण्यासाठी देऊन त्याचे भाडे खाण्यात धन्यता मानली आहे. इथे बाहेरून आलेल्या गरिबांच्या तसेच गाववाल्यांच्या भवितव्याशी आपण खेळतो आहोत, हे इथल्या तथाकथित भूमिपुत्रांना कळलेच नाही. हा कचरा जाळल्यामुळे होणारे प्रदूषण आणि त्याच्या विळख्यात असलेले दिवा याबद्दल कोणीही ‘ब्र’ काढत नाही. इथे कचरा टाकण्याचा अधिकार कुणी कोणाला दिला? इथे कचरा टाकूच कसे शकतात? हे प्रश्न आजपर्यंत दिव्याचे प्रतिनिधित्व करणाºया एकाही लोकप्रतिनिधीने विचारलेले नाही. दिव्यातील नागरिकांच्या आयुष्याशी का खेळता, हा सवाल ना स्थानिक आमदारांनी विचारला, ना स्थानिक खासदारांनी विचारला किंवा इथल्या चार नगरसेवकांनी विचारला.येथील जुन्या इमारतींसाठी ड्रेनेजलाइनची सोय नाही. ठाण्याच्या अनेक भागांत मलनि:सारण वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. मात्र, दिवा त्यापासून कित्येक मैल दूर आहे. गटारे, पायवाटा शोधाव्या लागतात. पिण्याचे पाणी असून नसल्यासारखेच आहे. पाणी मिळावे म्हणून अनेक घरांमध्ये, इमारतींमध्ये खासगी मोटार लावण्यात आल्या आहेत. अनधिकृत नळकनेक्शन वारेमाप दिली आहेत. त्यामुळे नळांना पाणी येतच नाही. तुम्हाला शुद्ध पाणी मिळेलच, याची शाश्वती नाही. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच या भागातील शेकडो नागरिकांना पाण्यासाठी रेल्वे ट्रॅक ओलांडून पलीकडे जावे लागते. पाणी आणताना रेल्वेची धडक लागून लोक किड्यामुंगीसारखे मरतात. दिव्यात कित्येक तास वीज नसते. पाच लाख लोकवस्तीकरिता धड एक आरोग्य केंद्र नाही. अनधिकृत इमारतीत थाटलेल्या खासगी इस्पितळांमधील उपचार दिव्यातील लोकांना घ्यावे लागतात. सर्वसामान्यांकडून अव्वाच्या सव्वा पैसा वसूल केला जातो. आजार बळावला व चांगले उपचार हवे असतील, तर डोंबिवली किंवा ठाणे गाठावे लागते. ठाणे परिवहनसेवेच्या बसने प्रवास करायचा असेल, तर त्यासाठी हायवेला जावे लागते. अंतर्गत वाहतुकीसाठी कोणत्याही प्रकारची सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे शेअर रिक्षांशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. मुजोर शेअर रिक्षाचालक दिव्यातील प्रवाशांच्या असहायतेचा गैरफायदा घेतात. स्टेशन परिसरात होणारी वाहतूककोंडी ही तर नित्याचीच आहे. सकाळ, दुपार, सायंकाळी तुम्हाला वाहतूककोंडीतून वाट काढत जाण्याशिवाय पर्याय नाही. स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत उतरलेले ठाणे महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ठाणेकर यांना खरेतर हा सवाल आहे की, तुमच्या आजूबाजूला तब्बल पाच लाख लोक अशा नरकयातना भोगत असताना तुम्ही स्मार्ट सिटीझन कसे होणार आहात? पारसिक चौपाटी किंवा थीम पार्क-बॉलिवूड पार्कसारखे तत्सम मोठे दिखाऊ प्रकल्प पूर्ण करण्यावर कोट्यवधी रुपये उधळण्याची गरज आहे का? गेल्या काही वर्षांत विकासाची बेटं निर्माण करण्याचा सोयीस्कर मार्ग नोकरशहा व लोकप्रतिनिधींनी अवलंबला आहे. एखाद्या रस्त्याचा, परिसराचा विकास करून तोच विदेशी पाहुणे, पर्यटक यांना दाखवायचा. दिव्यासारखा उपेक्षित परिसर त्यांच्या नजरेस पडणार नाही, याचा बंदोबस्त करायचा आणि विकास केला म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची. शहराचा सर्वांगीण विकास करायचा व विकासात सर्व समाजघटकांना सामावून घ्यायचे, याचा विसर राज्यकर्ते व प्रशासनकर्ते यांना पडला आहे. याचा परिणाम असा झाला आहे की, समाजातील विशिष्ट आर्थिक व जातवर्गात असंतोष खदखदत असून आर्थिकदृष्ट्या सक्षम उच्च मध्यमवर्ग नोकरशहा व राजकीय नेते यांचा सोशल मीडियात उदोउदो करीत आहे. हा उदोउदो बोलक्या वर्गाच्या मुखातून करवून घेताना आपण मोठ्या गोरगरीब वर्गाला डावलले आहे, याचे भान नोकरशहा व नेते या दोघांनाही राहत नाही. मग, एखादी ठिणगी दिव्यातील लोकांना रेल्वे रोखण्याकरिता उद्युक्त करते, तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की, हा उद्रेक का झाला?

टॅग्स :divaदिवाfloodपूर