शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

मोहम्मद रफींवर आयुष्य उधळून देणारे अरफनमौला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 2:32 AM

ख्यातनाम गायक मोहम्मद रफी यांचे दोन शागीर्द गफ्फार शेख आणि रशीद मणियार आजही आपल्या लाडक्या तानसेनाला भक्तिभावाने पुजत आहेत.

-  मुरलीधर भवार कल्याण : ख्यातनाम गायक मोहम्मद रफी यांचे दोन शागीर्द गफ्फार शेख आणि रशीद मणियार आजही आपल्या लाडक्या तानसेनाला भक्तिभावाने पुजत आहेत. गफ्फार शेख हे १९९५ ते ९८ या काळात जुहू येथील रफी यांच्या समाधीस्थळावर दिवसभर जाऊन बसत होते. मणियार यांना रफी यांचा सहवास लाभला असल्याने ते क्षण त्यांनी हृदयाच्या कुपीत अक्षरश: जपून ठेवले आहेत. मणियार यांनी रफींच्या मैफलींचे आयोजन करण्याकरिता आतापर्यंत सात लाखांची पदरमोड केली आहे.रफी यांचा ३१ जुलै हा स्मृती दिन. रफी यांना जाऊन ३७ वर्षे झाली, तरीही देशभरात त्यांचे अनेक चाहते आजही या दिवशी रफी यांची आठवण काढतात. अनेक ठिकाणी सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.गफ्फार शेख मूळचे आंध्र प्रदेशातील. त्यांचे कुटुंब कामानिमित्त कल्याणला आले व तेथेच स्थायिक झाले. गफ्फार यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण उर्दू माध्यमातून झाले. त्यांना गाणी ऐकण्याचे वेड लहानपणीच लागले. रफी यांची गाणी आवडू लागली. रफी यांची गाणी जमवणे, त्यातील बारकावे समजून घेणे, हा छंद त्यांना लागला. जुहू येथे कामाला लागलेल्या गफ्फार यांना तेथेच रफी यांची समाधी असल्याचे समजल्यावर त्यांनी ती गाठली. ही गोष्ट आहे १९९५ सालची. रफींच्या समाधीवर गेल्यावर गफ्फार यांना आत्मिक समाधान लाभू लागले. त्यामुळे दररोज पहाटे कल्याणहून पहिली गाडी पकडून ते रफी यांच्या समाधीपाशी पोहोचत. सायंकाळी ७ वाजेपर्यंत ते तेथेच बसून राहत. हा सिलसिला १९९८ सालापर्यंत म्हणजे तब्बल चार वर्षे सुरू होता. गफ्फार यांना लागलेले रफींचे हे वेड त्यांच्या कुटुंबाकरिता चिंतेचा विषय बनले. त्यानंतर, त्यांनी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. कामधंदा सुरू केल्यावर रफी यांचे सहगायक, गीतलेखक यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. त्यात त्यांचा बराच वेळ गेला. लोकवर्गणीतून त्यांनी भिवंडी येथे रफी यांच्या स्मरणार्थ एक संगीत कार्यक्रम २०१० साली आयोजित केला होता. त्या वेळी रफी यांचे चिरंजीव शाहीद रफी यांना निमंत्रित केले होते.कल्याणमध्येच राहणारे रशीद मणियार हेही दुसरे रफीवेडे. त्यांनी रफी यांच्यासोबत काम केले. रेडिओवरील चिरपरिचित अमीन सयानी यांच्या पुढाकाराने रशीद यांनी १९७७ साली ‘रोशन नाइट’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात रफी यांच्यासोबत मुकेश व हेमलता यांनी गाणी सादर केली होती. रफी यांची रशीद यांनी एक आठवण सांगितली की, रफी हे यांचे जावई फरीद यांच्यासोबत गाडीने जात असताना रस्त्यात एक फकीर पाहून रफींनी चालकास गाडी थांबवण्याची सूचना केली. त्यांनी त्यांच्या पायातील बूट काढून अनवाणी फकिराला दिले. हे पाहून त्यांचे जावई थक्क झाले. ही आठवण खुद्द त्यांच्या जावयाने आपल्याला सांगितल्याचे रशीद म्हणाले.एकदा रफी गाणे गाऊन स्टुडिओतून बाहेर पडत होते, त्या वेळी एक गरजवंत त्यांच्याकडे आला व त्याने त्याच्या मुलीच्या लग्नाकरिता पैशांची मागणी केली. तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता रफींनी खिशात हात घालून हातात आलेले नोटांचे पुडके त्या गरजवंताच्या हाती टेकवले. रफी यांच्या सहकाºयाने रफीसाहेबांना विचारले की, साहेब, तुम्ही पैसे न मोजताच दिले. त्यावर रफी यांनी उत्तर दिले की, उपरवालेने हमे गिनके दिया नही तो मै इसे कैसे गिनकर दे दू. रफींचे हे उत्तर ऐकून सहकारी थक्कच झाला. रशीद यांनी सांगितले की, लोक आपल्या आई-वडील बहीण-भाऊ यांना एकवेळ विसरतात. मात्र, रफींना विसरत नाहीत.रफी की याद नौशाद के साथरशीद व गफ्फार यांनी मिळून येत्या सोमवार, ३१ जुलै रोजी अत्रे रंगमंदिरात रफींच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. मात्र, रंगमंदिराची दुरुस्ती देखभाल असल्याने त्यांनी तूर्त स्थगित केला. दि.२४ डिसेंबर हा रफी यांचा तर २५ डिसेंबर हा संगीतकार नौशाद यांचा जन्मदिन असतो.त्यानिमित्त २४ डिसेंबर रोजी ‘मोहम्मद रफी की याद नौशाद के साथ’ हा कार्यक्रम होणार आहे. रशीद यांना प्रदीप सोनटक्के यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.रफी यांच्या स्मृतीला उजाळा देण्याकरिता कार्यक्रम आयोजित करण्याकरिता रशीद यांनी आतापर्यंत किमान सात लाखांची पदरमोड केली आहे.