भिवंडी : ‘समाज संघटित होऊन आपल्या मागण्यांकरिता मोर्चे काढतो, हे प्रगतीचे लक्षण आहे. त्यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग आहे. अशा समाज संघटित होणाऱ्या मोर्चांना विरोध न करता त्यांचे स्वागत केले पाहिजे. तसेच अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्यास त्यासाठी सरकारने नियमावली ठरवणे गरजेचे आहे’असे वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भिवंडीत एका खाजगी कार्यक्रमात केले.पिंपळघर येथे सर्वेश मोटर्स या गाड्यांच्या शोरूमच्या उद््घाटनासाठी ते भिवंडीत आले होते. त्यांची भेट घेत पत्रकारांनी मराठा मोर्चांबाबत छेडले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. कायद्याचा वापर सूड उगवण्यासाठी होत असल्याने कायद्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा घटना टाळणे गरजेचे आहे, त्याकडे लक्ष दिले पाहिजे. उरीमधील हल्लाप्रकरणी त्यांनी सांगितले की, ‘पंतप्रधान बरेच काही बोलतात, पण काहीच करत नाही, हे दु:ख आहे.
मराठा मोर्चांचे स्वागत करायला हवे
By admin | Published: September 26, 2016 2:14 AM