ठाणे: बुधवारी ठाण्यात झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी नितिन कंपनीजवळ रास्ता रोको आंदोलनाच्या दरम्यान दगडफेक, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांवर हल्ला करणे, दंगल माजविणे,चिथाविणे देणे आदी कलमांखाली शिवसेनेचे माजी नगरसेवक शरद कणसे, शाखाप्रमुख अशोक कदम यांच्यासह ३८ जणांविरुद्ध नौपाडा आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्वांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. संपूर्ण ठाणे शहरात अशा ४५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन आणि बंद स्थगित केल्याची घोषणा समन्वयकांनी केल्यानंतर ठाण्यात नितिन कंपनी येथे रस्ता रोको आंदोलन करणाºया आंदोलकांना पोलिसांनीही आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अनेकांनी मुंबईचे आणि ठाण्याचे वेगळे आंदोलन असल्याचा दावा करीत ठिय्या आंदोलन सुरुच ठेवले. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी या सर्वांना आता आंदोलन स्थगित झाले आहे. रस्ता सुरळीत करा, असे आवाहन करुनही त्यांनी हटवादी भूमीका घेतली. त्यातच दंगलीचा भडका उडाल्याचे पोलिसांनी सांगितले. जमावाच्या दगडफेकीत नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार लामतुरे, उपायुक्तांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अशोक भंडारे आणि निलेश मोरे हे तीन अधिकारी जखमी झाले. या तिघांनाही उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पोलिसांवर नाहक दगडफेक झाल्यानंतर मात्र दोन ते अडीच तास संयम ठेवलेल्या पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला. त्यानंतरही आंदोलन सुरुच राहिल्यानंतर अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्याचे पोलिसांनी सांगितले.
नौपाडयातील आरोपींची नावेमाजी नगरसेवक (शिवसेना) शरद कणसे, शिवसेना शाखाप्रमुख अशोक कदम (रामचंद्र नगर), रोहित वीर, मंगेश बांदल, महेश अतकरे, दिनेश साठे, शुभम दरेकर, अजय पाटील, वैभव पाटील, युवराज अवघडे, संदीप गावडे, हेमंत कुमावत, आकाश पवार, शिवाजी पाटील, शैलेंद्र उतेकर, संदेश पवार, संदीप कुटे, योगेश पवार, अनिकेत जाधव, निखील वाईकर, विघ्नेश भिलारे आणि प्रणाली गोविंद आदी २५ जणांचा यात समाावेश आहे. भिलारे हा एकमेव नौपाडयातील चंदनवाडी येथील रहिवाशी असून उर्वरित सर्वजण वागळे इस्टेट, रामचंद्रनगर, पडवळनगर,धर्मवीरनगर आणि आनंदनगर चेक नाका येथील रहिवाशी आहेत. कणसे आणि कदम हे दोघे ४८ वर्षीय तर इतर सर्वजण १८ ते २८ वयोगटातील आहेत. त्यांच्यावर सरकारी अधिकाºयांवर हल्ला करणे, एसटी, टीएमटी या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आदी कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत...................................याशिवाय, सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांचे शासकीय वाहन उलटून टाकणाºया दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. तर एका खासगी कारचे नुकसान केल्याप्रकरणी अन्य एक गुन्हा दाखल आहे. याव्यतिरिक्त मासुंदा तलाव भागात मुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडल्याप्रकरणी गौरव देशमुख (३०, रा. वागळे इस्टेट, ठाणे) याला अटक केली असून त्यातील अन्य एकाचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले......................................दरम्यान, कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील बाळकूम येथून येणाºया ब्रिजजवळ बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास टायर जाळून वाहतूकीला अडथळा करणाºया १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.तर कापूरबावडी नाका येथेही घोषणाबाजी करीत दुपारी २ वाजण्याच्या सुमारास रस्ता रोको करुन वाहतूक कोंडी करणाºया १०० ते १२० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी कोणालाही अटक झाली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी सांगितले...........................समान नागरी कायदा व्हावा...अटकेतील आंदोलकांपैकी अनेकांना कशासाठी आरक्षण हवे आहे, याचीही माहिती देता आली नाही. एकाने तर समान नागरी कायदा झाला पाहिजे, असे पोलिसांना सांगितले. तर बहुतेकांनी आम्ही आंदोलनात नव्हतोच, असा पवित्रा घेतला..........................आयोजक कुठे गेले?आंदोलन चिघळल्यानंतर पोलिसांनी सायंकाळपर्यत अनेकांची धरपकड केली. तेंव्हा अनेक तरुण आदोलकांच्या पालकांनी रात्री नौपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गर्दी केली होती. त्यांच्यापैकीच एकाच्या आईने मोर्चाचे आयोजक गेले कुठे? त्यांना मला भेटायचे आहे? माझ्या मुलाला कोण सोडविणार? असा सवालही तिने पोलिसांनाच केला..............................आधीच्या शिस्तीमुळे पोलीस गाफीलआधी ठाणे आणि महाराष्टÑभर मराठा क्रांती मोर्चा आयोजकांनी शिस्तीचे दर्शन घडवित शांततेने ५७ मोर्चे काढले होते. हाच इतिहास पाहून ठाण्यातील पोलीस गाफील राहिले. त्यामुळेच पोलीस वाहनांचे नुकसान आणि पोलीस अधिकारीही जखमी झाल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले....................................मुलीची सुटकानितिन कंपनीजवळ एका तरुणीला आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी घेराव घातला होता. काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून नौपाडयाचे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे यांनी तिची सुटका केल्याचे उपायुक्त डी. एस. स्वामी यांनी सांगितले..............................वागळे इस्टेटमध्ये १३ जणांना अटकनितिन नाका येथे वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिताराम वाघ, उपनिरीक्षक तायडे, हवालदार सुनिल शेलार आणि मिलिंद जोशी हे चौघे पोलीस आंदोलकांच्या दगडफेकीत जखमी झाले. तर काहींनी सहायक आयुक्त निलेवाड आणि वरिष्ठ निरीक्षक अफजल पठाण यांच्याही सरकारी वाहनावर दगडफेक केली. याप्रकरणी सुमारे ३०० ते ३५० जणांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून त्यांच्यापैकी दारा विक्रमादित्य चौहान, अंगत लालचंद चौहान, तेजस रेणोसे, सुनिल पाटील, शिवाजी कदम, निखील , अक्षय आबेकरकर, दिपेश बनके, राहूल चौहान, रमण लाड, राजेश बागवे, विश्वास चव्हाण आणि किरण मोरे आदी १३ जणांना वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली. या सर्वाची न्यायालयीन कोठउीत रवानगी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे अटकेतील आंदोलकांमध्ये तीन अमराठी आरोपींचाही समावेश आहे.