- मुरलीधर भवारकल्याण - भाजपच्या महाविजय २०२४ संकल्प दौऱ््यानिमित्त आज बाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची शहराच्या पश्चिम भागातील टिळक चौकात सभा संवाद सभा सुरु होती. या वेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकत्यांनी काळे झेंडे दाखवित एक मराठा लाख मराठा अशा जाेरदार घोषणाबाजी केली. भाजपची ही सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी घोषणाबाजी करुन निषेध व्यक्त करणाऱ््या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या वेळी सभेच्या ठिकाणी तणावाचे वातावरण तयार झाले होते. पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या सात जणांना चौकशीकरीता ताब्यात घेतले आहे. भाजपच्या या संवाद सभेला केंद्रीय पंचायत राजमंत्री कपील पाटील हे देखील उपस्थित होते.
मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध होण्यापूर्वी भाजपच्या विजयोत्सव २०२४ अंतर्गत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी कल्याणच्या ग्र’ण्ड गुरुदेव हा’टेलमधील सभागृहात कल्याण, शहापूर आणि मुरबाड येथील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर त्यांनी मराठा आरक्षणावरुन नेत्यांची गावबंदी आणि विरोध करणाऱ््या मराठा कार्यकर्त्यांसह संघटनांनी या विरोधाचा विचार करावा असे आवाहन केले होते.
त्यानंतर ते सायंकाळी नागरीकांशी संवाद साधण्याकरीता निघाले. त्यांची टिळक चौकात सभा सुरु झाली. त्याच वेळी मराठी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविण्याचे आंदोलन केले. उद्या डोंबिवली आणि कल्याण पूर्व भागात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दौरा आहे.