वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत सापडलेली अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिला अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट प्रकरणी दिलासा मिळाला आहे. ठाणे सत्र न्यायालयानं तिला जामीन मंजूर केला आहे. २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, आता तिची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे.
आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेल्या अभिनेत्री केतकी चितळेलाशरद पवारांवरीलफेसबुक पोस्ट प्रकरणी अखेर जामीन मंजूर झाला आहे. बुधवारी केतकीच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यात आली. यापूर्वीही तिला ठाणे सत्र न्यायालयानं अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात जामीन मंजूर केला होता. तिला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिने अटकेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ‘मला करण्यात आलेली अटक बेकायदा आहे,’ असा दावा केतकीने याचिकेद्वारे केला होता.