शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली; AIIMS रुग्णालयात केले दाखल
2
“निरोप द्यायला सभागृहात यायला हवे ना, फेसबुक लाइव्ह करुन...”; शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर
3
“सर्वांत जास्त पेपरफूट ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये भीषण चकमक; 3 पाकिस्तानी दहशतवाद्यी ठार
5
“मी तुमचाच, विरोधी पक्षनेते हे केवळ पद नाही तर...”; राहुल गांधींची प्रतिक्रिया, दिली गॅरंटी
6
पाकिस्तानच्या आरोपांपासून ते ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर होण्याच्या प्रश्नावर Rohit Sharmaची भन्नाट बॅटिंग
7
सेमी फायनलपूर्वी राशिद खानवर ICC ची कारवाई; बांगलादेशविरुद्धच्या लढतीतील चूक भोवली
8
काँग्रेस नेते सॅम पित्रोदा परतले; पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड
9
"ब्रँड हा ब्रँड असतो! राष्ट्रवादी या ब्रँडला कॉपी करण्याची..."; शरद पवार गटाने सुनिल तटकरेंना डिवचलं
10
मोठी बातमी : भारतीय संघात अचानक करावा लागला बदल, शिवम दुबे... 
11
'बैलगाडीतून जाईन पण Air India मध्ये पुन्हा बसणार नाही', प्रवाशाचा संताप; नेमकं काय झालं?
12
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? नवनीत राणांनी सविस्तर सांगितले
13
“महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणे जनतेचा अपमान, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या”: विजय वडेट्टीवार
14
“महायुती पक्की, राज्यात पुन्हा डबन इंजिनचे सरकार येईल”; चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास
15
₹23 रुपयांचा शेअर सुटलाय सुसाट, आली 'तुफान' तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुबंड, 220% नं वधारला
16
“विधानसभेला महायुतीत अजितदादांच्या वाट्याला २० ते २२ जागा येतील”; रोहित पवारांचा टोला
17
"तुरुंगातून बाहेर येऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नात"; सीएम केजरीवाल यांच्या अटकेवर पत्नी सुनीता केजरीवाल म्हणाल्या,...
18
ईव्ही क्षेत्रातली बडी कंपनी महाराष्ट्रात येणार; 4000 लोकांना रोजगार मिळणार; फडणवीसांची घोषणा
19
विरोधी पक्षनेते झालेले किती नेते पुढे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले? पाहा...
20
गळाभेट, हातात-हात अन्...; संसद भवनात दिसली चिराग-कंगनाची जबरदस्त केमिस्ट्री! बघा VIDEO

मॉरिशसचे  मराठी कलाकार अवतरणार ठाण्यात,  ’हा जावई’चा नाट्यप्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 4:38 PM

इंग्रज राजवटीत दीडशे वर्षापुर्वी महाराष्ट्रातून मॉरिशसला गेलेले मराठी बांधव मॉरिशसवासी झाले, परंतु आपल्या जन्मभू्मिची नाळ त्यांनी तोडली नाही.

ठाणे -  इंग्रज राजवटीत दीडशे वर्षापुर्वी महाराष्ट्रातून मॉरिशसला गेलेले मराठी बांधव मॉरिशसवासी झाले, परंतु आपल्या जन्मभू्मिची नाळ त्यांनी तोडली नाही. मॉरिशसच्या मातीशी एकरूप झाले परंतु मराठी भाषा, मराठी सण, मराठी संस्कृती आजही त्यांनी जपून ठेवली असून त्याचा प्रत्यय सोमवार दिनांक २ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजता ठाणेकर नाट्यरसिकांना अनुभवायला मिळणार आहे. मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राच्या वतीने सोना घूर्मे यांनी लिखित 'हा जावई' मारिशस नाट्य स्पर्धेतील विजयी नाटक माॅरिशसचे कलाकार सादर करणार आहेत. 

ठाण्याच्या प्रथम नागरिक महापौर सौ. मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या शुभहस्ते तसेच ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के, उप आयुक्त संदीप माळवी, माॅरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष अर्जून पुतलाजी यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी ४.३० वाजता डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. 

१९७७ पासून मॉरिशस सरकारच्या कला व सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने मराठी नाटक महोत्सव आयोजित केला जात आहे. मॉरिशसमध्ये स्थायिक असणारे हे मराठी कलाकार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असून खास ठाणेकर रसिकांसाठी ‘हा जावई’चा खास प्रयोग विनामुल्य  ठेवण्यात  आला आहे. तरी ठाणेकर रसिकांनी या नाट्य पर्वणीचा लाभ घ्यावा. मॉरिशसमध्ये विविध क्षेत्रात मराठी बांधव आपला वेगळा ठसा उमटवत आहे यामध्ये वैद्यकीय,अभियांत्रिकी,कायदा,अभिनय,राजकारण, प्रशासन या सर्वच क्षेत्रात ते अग्रेसर आहेत. मॉरिशसच्या विकासातील आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रात मराठी बांधवांचे योगदान महत्वपूर्ण  आहे.

 मॉरिशस येथे नाट्यप्रेमीच्या कौतुकास पात्र ठरलेल्या या नाटकाचे लेखन सोम्या धर्म्या यांनी केले असून यशवंत धर्म्या  यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. भारतात कोणत्याही प्रांतात,कोणत्याही जाती धर्मात आपला जन्म झाला असला तरी, आपण पहिले आणि अंतिमत: भारतीय असून आपण समस्त मानव जातीमध्ये प्रत्येकाच्या हृदयात प्रेम, आपुलकी, विश्वबंधुता मानवता कायम प्रस्थापित केली पाहिजे, असा संदेश देणारे ‘हा जावई’ हे नाटक खास ठाणेकर रसिकांच्या भेटीला येत अाहे