प्रज्ञा म्हात्रे ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचा फ्लॉप शो रविवारी पाहायला मिळाला. यंदाची ही स्पर्धा स्पर्धकांच्या अत्यल्प प्रतिसादात पार पडली. स्पर्धकांबरोबर प्रेक्षकांची गर्दी कमी होती, त्यापेक्षा व्यासपीठावरच गर्दी भरपूर होती.या मॅरेथॉनमध्ये २२ हजारांहून अधिक स्पर्धक धावल्याचा दावा ठाणे पालिका करत असली, तरी हा आकडा पाच ते सहा हजारांच्या आसपास असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गर्दीवरूनही ते स्पष्ट होत होते. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी स्पर्धकांचा सहभाग कमी झाल्याचे दिसून आले. स्पर्धेची सुरुवातच तुरळक उपस्थितीने झाली. स्पर्धेच्या सुरुवातीला २१ किमी अंतर (पुरुष) आणि १५ किमी अंतर (महिला) या गटांत स्पर्धकांचा मोजका सहभाग होता, या दोन्ही गटांतील स्पर्धकांचा अल्प प्रतिसाद पाहून, गर्दी दाखविण्यासाठी आयोजकांना या दोन्ही गटांतील धावपटूंना एकत्र सोडावे लागले.>ज्येष्ठांनी व्यक्त केला आनंदसतपाल सिंग, जे. एस. डब्ल्यू वाशिंद (प्रथम) : पहिल्यांदा या स्पर्धेत सहभागी झालो आणि प्रथम क्रमांक पटकाविला. खूप छान वाटतेय. मी रोज सकाळी दोन तास धावण्याचा सराव करतो.संभाजी डेरे, नारायणगाव,दिवा (द्वितीय) : मी महापालिकेतच नोकरीला होतो. या स्पर्धेत सात वर्षे सहभाग घेत आहे. स्पर्धेत सहभागी झाल्याचा आनंद आहेएकनाथ पाटील, कलानिकेतन कोनगाव (तृतीय) : माझा आनंद शब्दांत सांगू शकत नाही. मागच्या वर्षीही मी स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला होता.नानकी निहलानी (महिलांत प्रथम) : गेल्या वर्षीही मी प्रथम आले होते आणि या वर्षीही तो मान कायम ठेवला. या वयातही मी फिटनेसवर लक्ष देते.सुनंदा देशपांडे (द्वितीय) : ठाणे, नवी मुंबईमध्ये होणाºया मॅरेथॉन स्पर्धेत मी १६ वर्षे प्रथम क्रमांक पटकाविला आहे.सुजाता हळवे (तृतीय) : सहभागी होण्याचे हे दुसरे वर्ष होते. मागच्या वर्षी पाचवा क्रमांक पटकावला होता. पुढच्या वर्षीही सहभागी होणार आहे.>कविता राऊत यांनी दिली प्रेरणापिंटू यादव, नाशिक (द्वितीय, २१ किमी पुरुष गट) : मी मूळचा मी झारखंडचा आहे, परंतु सध्या नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. कविता राऊत यांचे नाव ऐकून स्पोर्टस््मध्ये येण्याचे प्रोत्साहन मिळाले. पहिल्यांदाच मी या स्पर्धेत सहभागी झालो. या आधी क्रॉस कंट्री मॅरेथॉनमध्येही सहभाग घेतला आहे.सचिन गमरे, अलिबाग (तृतीय, २१ किमी पुरुष गट) : मी रोज सहा ते आठ तास सराव करतो. या आधी अलिबागमध्ये आयोजित करण्यात आलेली मॅरेथॉन स्पर्धाही जिंकली होती. येथे आयोजन चांगले होते आणि पाऊस पडत असल्याने दमलो नाही.वर्षा भवारी, मुंबई पोलीस (द्वितीय, १५ किमी महिला गट) : मी स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करते. या वेळी सरावाला कमी वेळ मिळाला. त्यामुळे गती कमी पडली.ज्योती चौहान, संग्राम प्रतिष्ठान पुणे (तृतीय, १५ किमी महिला गट) : मी मुळात नागपूरची, परंतु पुण्यात सराव करत असते. दुसºयांदा या स्पर्धेत सहभागी झाले. मॅरेथॉनसाठी नियमितपणे दोन तास सराव केला होता.
मॅरेथॉनचा उत्साह ओसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 2:10 AM