शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

गांजाची तस्करी करणाऱ्यास मुंब्य्रातून अटक: पाऊण लाखांचा गांजा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 11:30 PM

मुंब्रा बाय पास रोडवरील लाल किल्ला ढाब्याच्यासमोर एक व्यक्ती गांजाच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती युनिट एकचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे युनिट एकच्या पथकाने राजू शेख याच्याकडून सुमारे साडे चार किलोचा गांजा जप्त केला.

ठळक मुद्देठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाईसाडे चार किलो गांजासह तस्करास घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गांजाची तस्करी करणा-या राजू मोहम्मद शेख (५०, रा. शिवडी, मुंबई) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून ७५ हजारांचाा साडे चार किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे.मुंब्रा बाय पास रोडवरील लाल किल्ला ढाब्याच्यासमोर एक व्यक्ती गांजाच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती युनिट एकचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अविनाश कु-हाडे आणि उपनिरीक्षक सरक यांच्या पथकाने ६ सप्टेंबर रोजी ५.२५ वाजण्याच्या सुमारास या ढाब्याच्यासमोर सापळा लावला. एका बनावट गि-हाईकाच्या मदतीने या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्या ताब्यातून चार किलो ४४० ग्रॅम वजनाचा गांजा ‘अब्बा हुजूर’ नाव असलेल्या पिशवीतून जप्त केला. याशिवाय, मोबाईल आणि काही रोकड असा ७७ हजार १२० रुपयांचा ऐवज त्याच्याकडून हस्तगत केला. त्याला ७ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. त्याने हा गांजा कुठून आणि कोणाकडून आणला, याची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख याला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीmumbraमुंब्रा