भिवंडी- देह व्यापार करणाऱ्या महिलांची वस्ती म्हणजे सदैव सावजाला खुणावणारे हात नजरेस पडतात. परंतु भिवंडी शहरातील हनुमान टेकडी या वस्तीतील महिलांचे हात दिवाळीतील पणत्या रंगविण्यात दंग झाले आहेत. येथील महिलांसाठी काम करणाऱ्या श्री साई सेवा संस्थेच्या डॉ स्वाती सिंग खान यांनी या महिलांना दिवाळी साठी दिवे रंगवून ते विक्री करण्याची संधी मिळवून दिली आहे.
संस्थेच्या माध्यमातून तब्बल पाच हजार पणत्या येथील महिला रंगसंगतीन सजवून त्या संस्थेच्या माध्यमातून विक्री करीत असून सर्व दिवे बाजारात संस्थेच्या माध्यमातून पाच हजार दिवे विक्री साठी तयार आहेत. मागील चार वर्षात या भागातील महिलांमध्ये श्री साई सेवा संस्था आरोग्य शिक्षण ,जनजागृती व समुपददेशना द्वारे केलेल्या कार्यतून येथील २५ हुन अधिक महिलांना या नरकयातना भोगायला लागणाऱ्या देह व्यापार व्यवसायापासून परावृत्त करीत त्यांना व्यवसायाची संधी दिली आहे .