शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

मुंबईत पोलीस असल्याचे सांगत तरुणीशी लग्न केले, पण पोलिसाऐवजी निघाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 10:31 PM

आपला नवरा पोलीस खात्यात नोकरीला नसल्याचा संशय करणच्या बायकोला आला. अवघ्या एका महिन्यात या घडामोडी घडल्याने तिने ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यालयात जाऊन किरणची माहिती काढली.

मुंबई - लग्नासाठी वाढत्या अपेक्षा आणि मुलींची घटलेली संख्या पाहून अनेकांकडून मुलींची आणि मुलींच्या कुटुबीयांची लग्नसाठी फसवणूक होत असल्याचं दिसत आहे. अंबरनाथ येथेही एका तरुणाने मुंबई पोलीस असल्याचे सांगत तरुणीची फसवणूक केली. विशेष म्हणजे लग्नानंतर एक महिन्याने तरुणीला हे सत्य समजले. त्यानंतर, पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित करुणीने रीतसर तक्रार दिली. मुंबईत पोलीस असल्याचे सांगत तोतया पोलिसाने एका तरुणीशी लग्न केले. लग्नानंतर महिनाभरातचा आपला नवरा पोलीस नसल्याचा तरुणीला संशय आला. त्यामुळे, पोलीस आयुक्तालयातून नवऱ्याबद्दल माहिती घेतल्यानंतर तिचा संशय खरा ठरला. 

किरण शिंदे असे आरोपीचे नाव असून वास्तविक जीवनात तो वॉचमन म्हणून काम करतो. मात्र, किरणने आपण मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असल्याचे सांगून अंबरनाथमधील 21 वर्षीय तरुणीशी विवाह केला. तरुणीला आणि तिच्या कुटुंबीयांना पोलीस वर्दीतील फोटो, वर्दीवरील नेम प्लेट आणि ओळखपत्र दाखवल्याने किरणवर त्यांचा विश्वास बसला. 13 डिसेंबर 2018 ला तरुणीचे लग्न किरण शिंदेशी झाले. मात्र, वारंवार खाकी वर्दीवर घरी येणे, कामाची एकच नियमित वेळ असणे, याबाबत विचारणा करताच उडवाउडवीची उत्तरे देणे, त्यामुळे किरणचे बिंग फुटले.

आपला नवरा पोलीस खात्यात नोकरीला नसल्याचा संशय करणच्या बायकोला आला. अवघ्या एका महिन्यात या घडामोडी घडल्याने तिने ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यालयात जाऊन किरणची माहिती काढली. त्यावेळी, आपला नवरा पोलीस नसून वॉचमन असल्याचे समजताच तिला धक्काच बसला. त्यानंतर पीडित तरुणीने सापळा रचून पोलिसांच्या मतदाने किरणच्या नकली पोलिसाच बिंग उघडं पाडलं. तर, 21 वर्षीय मुलीला फसवणाऱ्या किरणला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा मुलींच्या आणि मुलांच्या लग्नासंदर्भातील गंभीर समस्यांवर चर्चा सुरू झाली आहे.  

टॅग्स :MumbaiमुंबईPoliceपोलिसmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारी