लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : लग्न झाले असताना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या विजय नथुराम लोखंडे (३०) याला शनिवारी कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. पालघर येथील इभाडपाड्यातील एका तीसवर्षीय महिलेशी विजयने सुरुवातीला मैत्री वाढवली. याचदरम्यान, त्याने आपले लग्न झाले असतानाही ते लपवून ठेवून लग्नाचे आमिष दाखवून पातलीपाडा येथील तिच्या चुलत भावाच्या घरात तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. त्यानंतर, लग्न न करता फसवणूक केली. हा प्रकार आॅगस्ट २०१६ ते एप्रिल २०१७ दरम्यान घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून टिकुजिनीवाडी येथे राहणाऱ्या विजयला शनिवारी अटक केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अशोक एम. साळवे करीत आहेत.
लग्नाच्या आमिषाने फसविले
By admin | Published: May 16, 2017 12:20 AM