शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

रस्ते दुरुस्तीवर मनसे आक्रमक

By admin | Published: January 14, 2017 6:24 AM

शहरातील कॅम्प नं.-४, जुन्या महाराष्ट्र बँकेसमोरील रस्त्यावर दुरुस्तीच्या नावाखाली डांबराविना खडी टाकली जात आहे.

उल्हासनगर : शहरातील कॅम्प नं.-४, जुन्या महाराष्ट्र बँकेसमोरील रस्त्यावर दुरुस्तीच्या नावाखाली डांबराविना खडी टाकली जात आहे. याबाबतची तक्रार मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम यांनी आयुक्तांकडे केल्यावर पुन्हा रस्ता दुरुस्तीचे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. या प्रकाराने रस्ता दुरुस्तीतील घोळ समोर आला असून पालिका साडेचार कोटींतून प्रभागानुसार रस्त्याची दुरुस्ती व खड्डे भरत आहे. उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी साडेचार कोटींची तरतूद केली होती. प्रभागानुसार रस्ता दुरुस्ती व खड्डे भरण्याची निविदा काढून दिवाळीनंतर कामाला सुरुवात केली. आयुक्तांच्या आदेशानुसार सर्वत्र कामे चांगल्या प्रकारे सुरू आहेत. मात्र, कॅम्प नं.-४, मुख्य मार्केट येथील जुन्या महाराष्ट्र बँकेच्या शाखेसमोरील रस्त्यावर गुरुवारी दुपारी डांबराविना खडी टाकून रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात आले. काही तासांतच खडी उखडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली.मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम यांनी कनिष्ठ अभियंता तरुण सेवकानी यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाइल बंद होता. तर, शहर अभियंता रामप्रसाद जैस्वाल पालिका कामात बिझी होते. अखेर, त्यांनी आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याशी संपर्क साधून रस्त्याची निकृष्ट दुरुस्ती केल्याचे सांगून उखडलेल्या रस्त्याचे फोटो पाठवले. आयुक्तांनी याची दखल घेऊन रस्ता पुन्हा दुरुस्त करण्याचा आदेश दिला. पालिकेच्या कंत्राटदाराकडून खासगी इमारतीच्या कॉलनीतील रस्ता दुरुस्ती केली जात आहे. त्याला कदम यांनी आक्षेप घेऊन आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)