शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे विस्कळीत; सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे प्रवाशांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 10:29 PM

साडेसातनंतर रेल्वे पूर्ववत झाली. मात्र, रात्री उशिरापर्यंत रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते.

जितेंद्र कालेकर 

ठाणे - ठाणे रेल्वे स्थानकातील सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी ठाण्याहून कल्याणकडे आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलची वाहतूक ठप्प झाली. यामुळे कार्यालये सुटण्याच्या वेळी प्रवाशांना सायंकाळी ६.३७ ते ७.३३ या एक तासांच्या कालावधीमध्ये ठाणे रेल्वे स्थानकावर अडकून पडावे लागले. यामुळे अप व डाऊन मार्गावर लोकलच्या रांगा लागल्या होत्या. गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलमध्ये तासन् तास अडकून पडल्याने प्रवासी उकाड्याने अक्षरश: हैराण झाले. 

ठाणे व कळवादरम्यान सिग्नल यंत्रणेत ६.३७ वाजता बिघाड झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलद व धीम्या मार्गावरील वाहतूक बंद झाली. ठाण्याकडे येणाऱ्या लोकल मुलुंड स्थानकातच थांबविण्यात आल्यामुळे रेल्वेच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक ठप्प झाल्याने रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती.

सुरुवातीला ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवरील सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे कल्याणच्या दिशेने जाणारी लोकल सेवा थांबविण्यात आली. त्यानंतर फलाट क्रमांक तीन, चार आणि पाचवरही अशीच समस्या उद्भवल्यामुळे अप व डाऊन मार्गावरील जलद व धीमी सेवा बंद झाली. सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी तब्बल तासभर रेल्वे ठप्प झाल्याने नोकरदारांचे प्रचंड हाल झाले. अनेकांनी रिक्षा, टँक्सी, ओला व उबर या माध्यमातून घर गाठण्याचा प्रयत्न केला. रेल्वे ठप्प झाल्याने रिक्षा, टॅक्सी चालकांनी अवाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांना लुबाडले. ओला, उबरची मागणी वाढल्याने त्यांच्याही दरात वाढ झाली. ज्यांना या माध्यमातून घर गाठणे शक्य नव्हते ते रेल्वे सेवा पूर्ववत होण्याची वाट पाहत गाडीत अथवा फलाटावर बसून होते. 

साडेसातनंतर रेल्वे पूर्ववत झाली. मात्र, रात्री उशिरापर्यंत रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. नेमका कशामुळे हा बिघाड झाला, याचे काहीच उत्तर रेल्वे स्थानकातील अधिकाऱ्यांना देता येत नसल्याची तक्रार संतप्त प्रवाशांनी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या पोलीस पथकासह रेल्वे सुरक्षा दलाची जादा कुमक तैनात केली होती.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेthaneठाणे