भिवंडी: महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यांवर पडलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे अंजुर फाटा ते वंजारपट्टी नाका या दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य नागरिक,वाहन चालक,पादचारी आणि शाळकरी विद्यार्थ्यांना करावा लागत आहे.सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेली वाहतूक कोंडी सायंकाळ पर्यंत कायम होती. वाहतूक कोंडीने नागरिकांसह प्रवासी प्रचंड हैराण व त्रस्त झाले होते.या रस्त्या वर महानगरपालिकेने आतापर्यंत सुमारे ६० लाख रुपये खर्च करून सिग्नल यंत्रणा बसवलेले आहे.परंतु मागील दोन वर्षां पासून ही सिग्नल यंत्रणा कधी सुरूच झाली नाही.तर वाहतूक पोलिसांची मर्यादित संख्या असल्यामुळे प्रत्येक नाक्या नाक्यांवर वाहतूक पोलीस नसल्याने या वाहतूक कोंडीतून भिवंडीकरांची सुटका होणार कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे.याच बरोबर भिवंडी वाडा मनोर रस्त्यावर देखील प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.भिवंडी शहरातून जाताना शेलार कवाड यादरम्यान सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून या वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.
भिवंडीत प्रचंड वाहतूक कोंडी; वाहन चालकांसह प्रवासी हैराण
By नितीन पंडित | Published: July 15, 2024 6:05 PM