शहरं
Join us  
Trending Stories
1
Brahmos Deal with Vietnam : 'ब्रह्मोस' भारताला आणखी मालामाल करणार, हा छोटासा देश चीनशी टक्कर घेणार; होणार 700 मिलियन डॉलरची डील!
2
"तुम मराठी लोग गंदा है...", घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद, मनसैनिकांनी काय केलं पाहा...
3
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शनी देणार 'या' पाच राशींना अक्षय्य धनलाभ आणि कीर्ती!
4
ट्रम्प टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेची रिझर्व्ह बँकही चिंतेत; अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्यक्त केली मोठी भीती
5
भयंकर! ४०० प्रवाशांसह बोट नदीत उलटली, ५० जणांचा मृत्यू, १०० जण बेपत्ता
6
"मला मुलगी झाल्याने काही लोक निराश झाले", सोहा अली खानचा खुलासा; म्हणाली, "मी तर..."
7
"तुमचे १०० बाप झाली आले तरी..."; गरजला बाळासाहेबांचा 'एआय' आवाज; भारावले शिवसैनिक!
8
रोटी, कपडा और मकान नव्हे; आता हवेत लाइक, व्ह्यूज आणि सबस्क्रायबर
9
"मुस्लीम असून मी हिंदूशी विवाह केल्याने...", आंतरधर्मीय लग्नामुळे १० वर्षांनीही सोहा खानला करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना
10
नवऱ्याचा काटा काढला अन् बेडवर साप ठेवला, कारण...; बायकोचा विषारी प्लॅन, असा झाला पर्दाफाश
11
VIDEO: 'सुपर ओव्हर'मध्ये राजस्थानला होती जिंकायची संधी, पण 'फ्री हिट' मिस झाली अन् मॅच गमावली
12
सुरेश धस-धनंजय मुंडे आज एकत्र दिसणार?; शिरूर कासारमधील सोहळ्याकडे राज्याचं लक्ष
13
राज्यात आता रोबोट करणार मॅनहोलची सफाई, २७ महापालिकांसाठी १०० रोबोट
14
आयपीएलदरम्यान बीसीसीआयची मोठी कारवाई, सहाय्यक प्रशिक्षकांसह तिघांना पदावरून हटवलं!
15
"मी माझी फिल्म बघितली अन्.."; 'सुशीला सुजीत' सिनेमा पाहिल्यावर सोनाली कुलकर्णी काय म्हणाली?
16
जगातील निम्मे सोने असूनही बुडाला देश; अर्थव्यवस्था रुळावर यायला लागले तब्बल १२ वर्षे
17
Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला मिळतील १६,६५० रुपये
18
Video - धक्कादायक! चालता बोलता 'तो' खाली कोसळला, सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यूचा संशय
19
जगभर : युक्रेनच्या स्त्रिया शिवताहेत ‘किकिमोरा वॉरसूट्स’, युद्धातील संघर्ष कथा
20
IPL 2025: हाच खरा 'मॅचविनर'! अवघ्या १२ चेंडूत मिचेल स्टार्कने फिरवला सामना, संघ विजयी

यूट्युबवर व्हिडीओ पाहून रिक्षाचोरीची 'मास्टरी'! एमकॉम, बी टेक सुशिक्षित चोरट्यांचेही आव्हान

By जितेंद्र कालेकर | Updated: April 17, 2025 13:03 IST

ठाण्याच्या नौपाडा भागातून ३० मार्च रोजी झालेल्या रिक्षाचोरीचा शोध घेताना ठाणे ते मुंब्रा भागातील ८० सीसीटीव्हींची पडताळणी केल्यानंतर सय्यदची ओळख पटली.

- जितेंद्र कालेकर, ठाणेयू ट्युबवर व्हिडीओ पाहून रिक्षा चोरीचे ट्रेनिंग घेत चोरीमध्ये 'मास्टरी' मिळविणाऱ्या शबाब हुसेन रिझवी सय्यद (४१) या एमकॉम झालेल्या चोरट्याला नौपाडा पोलिसांनी अटक केली. सुमारे ८० सीसीटीव्हींच्या पडताळणीतून त्याचा शोध घेण्यात आला. मोबाइलची जबरी चोरी करणाऱ्या पदवीधर चोरट्यालाही अशीच अटक झाली. 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून वृद्धाच्या बँक खात्यातून ८ लाखांचा डल्ला मारणाऱ्या बीटेक आरोपीलाही वागळे इस्टेट पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली.

ठाण्याच्या नौपाडा भागातून ३० मार्च रोजी झालेल्या रिक्षाचोरीचा शोध घेताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन आणि निरीक्षक शरद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भांगे यांच्या पथकाने ठाणे ते मुंब्रा भागातील ८० सीसीटीव्हींची पडताळणी केल्यानंतर सय्यदची ओळख पटली. त्याला २०२४ मध्येही रिक्षाचोरीच्या प्रकरणात अटक केली होती. एमकॉम झालेल्या शेखने दुबईत विमानतळावर वाहनचालक म्हणून नोकरी केली होती. तो पुन्हा नौपाड्यात रिक्षाचोरीसाठी येणार असल्याची टीप मिळाली आणि त्याला ६ एप्रिल रोजी सापळा रचून अटक केली.

जबरी चोरीमध्ये अडकला पदवीधर

मोटारसायकलवर येऊन जबरी चोरी करणाऱ्या फैज शेख यालाही २२ एप्रिल रोजी नौपाडा पोलिसांनी अटक केली. पदवीधर फैज हा अझरुद्दीन मोमीन याच्या मदतीने मोबाइलची जबरी चोरी करायचा. नौपाडा ते भिवंडी मार्गावरील सुमारे ९० सीसीटीव्हींच्या पडताळणीतून त्याला पकडले. त्याने १०० पेक्षा अधिक मोबाइलची चोरी केल्याचे उघड झाले.

डिजिटल अरेस्ट करणारा निघाला बी. टेक

वागळे इस्टेट भागात राहणाऱ्या वृद्धाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत आठ लाखांचा गंडा घातला होता. टोळीच्या म्होरक्याने सांगितल्याप्रमाणे काम करणारा रोचक श्रीवास्तव या बी.टेक आरोपीला वागळे इस्टेट पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अतुल जगताप यांच्या पथकाने उत्तर प्रदेशातून डिसेंबर २०२४ मध्ये अटक केली.

दुबईत असताना सय्यदला त्याची पत्नी सोडून गेली. याच वैफल्यातून त्याला दारूचे व्यसन लागले. कुटुंबीयांनीही त्याच्याकडे पाठ फिरवली. व्यसन भागविण्यासाठी त्याने रिक्षाचोरी सुरू केली. रिक्षा चोरी केल्यानंतर भाडे घ्यायचे. पेट्रोल संपल्यानंतर रिक्षा सोडायची आणि त्याच पैशातून तो खर्च भागवायचा. त्याच्याकडून सात चोरीचे गुन्हे उघड झाले असून, चार रिक्षा आणि दोन दुचाकी हस्तगत केल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjobनोकरीYouTubeयु ट्यूबPoliceपोलिसtheftचोरी