प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारांचे मोदक बाजारात विक्रीसाठी आले आहेत. मिठाईच्या दुकानांत वेगवेगळ्या फ्लेवर्सचे मोदक पाहायला मिळत आहेत. यंदा महागाईमुळे सर्वच दरांत वाढ झाली असल्याने उकडीच्या मोदकापाठोपाठ मावा आणि इतर प्रकारच्या मोदकांचे दर देखील वाढले आहेत. १० किलो बुंदीच्या मोदकाचे दर ३६०० रुपयांवर पोहोचले आहेत.
गणेशोत्सवाला दोन दिवस शिल्लक आहेत. खरेदीची सर्वत्र लगबग दिसून येत आहे. रविवार असल्याने बाजारपेठा गर्दीने तुडुंब भरुन वाहत आहेत. महागाईची झळ सर्वच वस्तूंना बसली असून सर्वच वस्तूंनी दरामध्ये उच्चांक गाठला आहे. याबरोबर बाप्पाचा आवडचा नैवेद्य म्हणून ओळख असलेल्या उकडीच्या मोदकातही ५ रुपयांनी वाढ झाली आहे. ३० ते ३५ रुपये प्रतिनग असे उकडीच्या मोदकाचे दर आहेत. त्याचबरोबर मिठाईच्या दुकानांत गणेशोत्सवाच्यानिमित्ताने उपलब्ध झालेले विविध प्रकारांच्या मोदकांच्या दरांतही १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ६८० रु किलोपासून १२४० रुपयांपर्यंत मोदकांचे दर आहेत. दोनदा दुधाचे दर वाढले त्यामुळे माव्याचेही दरांत वाढ झाली तसेच, इंधनाचा खर्च याचा फटका या मोदकांना बसल्याचे मिठाईच्या दुकानाचे मालक सिद्धार्थ जोशी यांनी सांगितले.मोदकांचे प्रकार मावा मोदक, बुंदी मोदक, काजू मोदक, मलाई मोदक (त्यातही , (मँगो, स्ट्रॉबेरी, पिस्ता, तिरंगा) ड्रायफ्रूट मोदक, कंदी मोदक, जायफळ कंदी मोदक आणि कडक बुंदी मोदक, केशर मलाई, आंबा मोदक, चॉकलेट मोदक हे विविध प्रकार उपलब्ध आहेत. बुंदीचा मोदक१० किलो : ३६०० रुपये५ किलो : १८०० रुपयेमाव्याचा १ किलोचा मोदक : ६८० रुपये किलो