शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

महापौर, उपमहापौर निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाईचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 10:57 PM

सदस्यत्व रद्द करणार; भाजप, शिवसेना, काँग्रेसचा इशारा

मीरा रोड : भाजपच्या मॉरस रॉड्रिक्स, परशुराम म्हात्रे, वैशाली रकवी आणि अश्विन कासोदरिया या चार नगरसेवकांनी महापौर, उपमहापौर निवडणुकीत बंडखोरी केल्याने, तर विजय राय गैरहजर राहिल्याने त्यांचे पद रद्द करण्याची कारवाई तातडीने सुरू करणार असल्याची माहिती भाजप नेत्यांनी दिली. निवडणुकीत भाजपला सहकार्य करणाºया शिवसेना नगरसेविका अनिता पाटील, दीप्ती भट आणि काँग्रेसच्या सारा अकरम या तिघींचे सदस्यत्व रद्द करण्याचा इशारा सेना आणि काँग्रेसने दिला आहे. दरम्यान, काँग्रेसचे भूमिगत नगरसेवक नरेश पाटील आणि अमजद शेख यांनी मंगळवारी सभागृहात हजेरी लावून महाविकास आघाडीला मतदान केले. या दोन्ही नगरसेवकांनी आधी भाजपमध्ये प्रवेश केला होता.भाजपमधील अंतर्गत नाराजी तसेच इच्छुकांमधील मतभेदांवरून या निवडणुकीत चमत्कार घडवण्याच्या शिवसेना नेत्यांच्या वल्गनाच ठरल्या. या निवडणुकीत सेनेच्या शिर्केंना केवळ ३६ मतेच मिळाल्याने सर्वांनी काढता पाय घेतला.भाजपने हाणून पाडले विरोधकांचे डावपेचमहापौरपदासाठी माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मर्जीतील रूपाली शिंदे-मोदी तर उपमहापौरपदासाठी ध्रुवकिशोर पाटील यांची नावे आघाडीवर होती. पण, भाजपच्या ४५ नगरसेवकांनी जसनाळे यांच्या नावाला पसंती दिली. त्यामुळे आधीच नाराजी, त्यात फुटीची चिन्हे पाहून चव्हाणांनी स्वत:च्या हातात सूत्रे घेतली. नगरसेवकांचे पहिल्यांदाच व्यक्तिगत मत विचारले गेल्याने हसनाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. उपमहापौरपदासाठी मेहता समर्थक ध्रुवकिशोर यांचा पत्ता कापल्याने त्यांचेच दुसरे समर्थक गेहलोत यांना उमेदवारी देण्यात आली. ज्येष्ठ नगरसेवक मदन सिंह, प्रभात पाटील, रीटा शाह यांच्यासह अन्य इच्छुकांना डावलल्याने नाराजीचा सूर होता. त्यातच शिवसेना आणि गीता जैन यांच्याकडून भाजपला सुरुंग लावण्याची भीती असताना चव्हाण यांनी विरोधकांची खेळी यशस्वी होऊ दिली नाही. महत्त्वाचे म्हणजे भाजपकडून सेना-काँग्रेसच्या नगरसेवकांना फोडण्याचा जोरदार प्रयत्न झाला. सेना-काँग्रेसच्या तीन नगरसेविका शेवटपर्यंत बेपत्ता राहिल्या.गीता जैन शिवसेनेसोबत : आमदार गीता जैन यांना भाजप नेतृत्वाकडून सातत्याने पालिकेतील सत्ता सहभागात केवळ पोकळ आश्वासनेच मिळाल्याने त्यांनी शिवसेनेची कास धरल्याचे आजच्या निवडणुकीवरून स्पष्ट झाले. भाजप नेतृत्व सतत मेहतांना झुकते माप देत असल्याने त्या संतापल्या होत्या. गीता यांनी त्यांच्या समर्थक भाजपतील चार नगरसेवकांसह शिवसेनेला मतदान केले. त्यामुळे पालिका व शहरातील राजकारणात आता गीता जैन या शिवसेनेसोबत जाणार असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळे भाजपसमोर स्वत:चे वर्चस्व राखण्याचे आव्हान राहणार आहे.अभूतपूर्व पोलीस बंदोबस्तनगरसेवकांची पळवापळवी व त्यावरून झालेल्या तक्रारी तसेच नरेंद्र मेहतांच्या व्हिडीओ क्लिप व्हायरल होऊन भाजपच्याच नगरसेविका नीला सोन्स यांनी मेहतांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी केलेली तक्रार यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. त्यामुळे या निवडणुकीत ठाणे ग्रामीण पोलिसांनी कधी नव्हे तो तब्बल साडेपाचशे कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला होता. अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांच्यासह उपअधीक्षक शशिकांत भोसले तसेच अनेक अधिकारी जातीने बंदोबस्तासाठी तैनात होते. मुख्यालयाचे मागचे प्रवेशद्वार बंद करून पुढील प्रवेशद्वाराने केवळ ओळखपत्र असणाºया आवश्यक लोकांनाच मुख्यालयात प्रवेश दिला जात होता.सर्वांना सोबत घेऊन काम करणार - महापौरनवनिर्वाचित महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची ग्वाही दिली. या शहराने मला खूप काही दिले असून, महापौरपद मिळाल्याने जनतेचा आणि पक्षाचा विश्वास सार्थ ठरवेन. त्याला तडा जाईल, असे काम होणार नसल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकBJPभाजपा