शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

महापौर मॅरेथॉनला प्रायोजक मिळेनात

By admin | Published: July 29, 2015 12:07 AM

मागील २५ वर्षे सातत्याने महापौर वर्षा मॅरेथॉन राबविणाऱ्या ठाणे महापालिकेला आता या स्पर्धेसाठी केला जाणारा खर्च पेलवणे कठीण झाले आहे. त्यामुळे ही स्पर्धा प्रायोजकांच्या माध्यमातून घेण्याचा

- अजित मांडके,  ठाणेमागील २५ वर्षे सातत्याने महापौर वर्षा मॅरेथॉन राबविणाऱ्या ठाणे महापालिकेला आता या स्पर्धेसाठी केला जाणारा खर्च पेलवणे कठीण झाले आहे. त्यामुळे ही स्पर्धा प्रायोजकांच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा प्रथमच २६ व्या वर्षात पर्दापण करणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धा ही संपूर्णपणे प्रायोजकत्वाच्या माध्यमातून साकारली जाणार असून यासाठी खाजगी इव्हेंट मॅनेजरची मदत घेतली जाणार आहे. परंतु काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या स्पर्धेसाठी अद्यापही प्रयोजक मिळत नसल्याने स्पर्धेची तारीख अद्यापही निश्चित झालेली नाही. पालिकेने घातलेल्या अटी, शर्र्तींंमुळेच पालिकेला प्रायोजक मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच स्टेज, मंडप व इतर साहित्य पुरविण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा त्याला मुदतवाढ देण्याची नामुष्की पालिकेवर ओढावली आहे. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा ही दरवर्षी वादग्रस्त ठरली आहे. मागील वर्षी तर या स्पर्धेवर होणाऱ्या खर्चाबाबत आक्षेप घेऊन आतापर्यंत झालेल्या स्पर्धांवर झालेल्या खर्चाचे आॅडिटही करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. तसेच काँग्रेसने न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला होता. दरम्यान या मॅरेथॉन स्पर्धेत दरवर्षी स्थानिक पातळीवरील खेळांडूसह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील सुमारे ३५ हजारांच्या आसपास खेळाडू सहभागी होत असतात. मागील वर्षी या स्पर्धेसाठी पालिकेने ४० लाखांची आर्थिक तरतूद केली होती. परंतु, ती देखील काहीशी अपुरी ठरल्याने पालिकेने मागील वर्षीच प्रायोजकांचा आसरा घेतला होता. परंतु आता या संपूर्ण स्पर्धेचा खर्चाचा भारच पेलवणे शक्य नसल्याने पालिकेने प्रायोजकांच्या माध्यमातून ही स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला असून इव्हेंट मॅनेजरवर या संपूर्ण स्पर्धेची जबबादारी सोपवून त्यांनाच प्रायोजक शोधण्याचे काम देण्यात येणार आहे. या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी करण्याचा पालिकेचा प्रयत्न असून या स्पर्धांना मोठी उंची मिळवून देऊन त्यांना कार्पोरेट लेव्हलवर नेण्याचा मानस असल्याची माहिती प्रशासनाने दिली.प्रायोजक मिळत नसल्याने या स्पर्धाचे पुढील कार्यक्रमही निश्चित होण्यास अडचणी येत असून मागील वर्षी ९ आॅगस्ट रोजी ही स्पर्धा घेण्यात आली होती. परंतु आता जुलै महिना संपत आला तरी देखील या स्पर्धेबाबत अद्यापही प्रशासन आळीमिळी गुपचिळीची भूमिका घेत आहे. प्रायोजकांना पालिकेने घालून दिलेल्या अटींची पूर्तता करावी लागणार आहे.जाहीरात डिझायनिंग व फ्लेक्स प्रिटींगच्या अटीपाणी व एनर्जी ड्रींकचे बॅनर्स १० बाय ६ फुट असावेत, स्टेज व मंडप बाबत १० बाय ३० फुटांचा बॅकड्रॉप असावा, आडव्या कमानींवर पदाधिकारी आणि उजव्या कमानींवर प्रायोजकांचे फोटो असावेत, जाहीरात करण्याचे अधिकारी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसापर्यंत असणार आहेत, किमंतीच्या अनुषगांने प्रायोजकांना जागा बहाल केल्या जातील.इलेक्ट्रॉनिक चिप : २१ किमी पुरुष व १५ किमी महिला गटाच्या स्पर्धांच्या अचूक वेळेच्या नोंदीच्या नियंत्रणासाठी टाईमिंग चिपची प्रणाली आवश्यक टी - शर्ट टोपी पुरविण्याकरीताच्या अटी महापालिकेच्या शाळातील विद्यार्थ्यांना टी शर्ट व टोपी पुरविणे, पंच, पायलट, अधिकारी, स्वयंसेवक, निरिक्षक, पर्यवेक्षक यांना देखील हे साहित्य पुरविणे, टी शर्ट आणि टोपीवर पुढील बाजूस डाव्याबाजूला मॅरेथॉनचा आणि मागील बाजूस जाहीरात असावी. विशेष म्हणजे या पैकी पुरस्कर्ता कोणत्याही एका बाबीकरीता अथवा सर्व बाबींकरीता पुरस्कर्ता होऊ शकतो. परंतु यापैकी इतर काही अथवा संपूर्ण स्पर्धेचा खर्च उचलण्यास पुरस्कर्ता तयार असल्यास विशेष परवानगी घेऊन मान्यता देण्याचा घाटही पालिकेने घातला आहे. परंतु प्रायोजकत्व हे केवळ वस्तू स्वरुपातच स्वीकारण्यात येतील असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. जाहीरात डिझायनिंग व फ्लेक्स प्रिटींगच्या अटीविशेष म्हणजे प्रायोजकत्व शोधतांना छोट्या बाबींपासून मोठ्या बाबींवर होणारा सर्वच खर्च हा प्रायोजकत्वाच्या माध्यमातून पालिका घेणार आहे. यामध्ये चेस्ट नंबर छपाई पासून पाणी, ड्रींक, इतर साहित्य पुरविणे, स्टेज, मंडप, चषक, स्मृती चिन्हे आदी देखील यामाध्यमातून घेतले जाणार आहे. प्रायोजक मिळावा म्हणून पालिकेने निविदा मागविली होती, परंतु पालिकेने घातलेल्या अटी, शर्तींमुळेच पालिकेला प्रायोजक मिळणे अवघड झाल्याने पालिकेने पुन्हा या निविदेला मुदतवाढ दिली आहे. १० गटात होणार स्पर्धा...पुरुष२१ किमीराज्यस्तरीयमहिला१५——१८ वर्षाखालील मुले १० किमी——१५ वर्षाखालील मुले ५जिल्हास्तरीय१५ वर्षाखालील मुली५——१२ वर्षाखालील मुले५——१२ वर्षाखालील मुली३ ——जेष्ठ नागरीक पुरुष५०० मीटर——जेष्ठ नागरीक महिला५०० मीटर——रन फॉर फन-————