शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

मालमत्ता थकबाकीदारांच्या यादीत चक्क महापौरही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:23 AM

उल्हासनगर महापालिकेने मालमत्ताकरवसुली करण्यासाठी तब्बल चार वेळा अभय योजना राबवून व्याज माफ केले. अनेकवेळा नोटिसा बजावल्या

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेने मालमत्ताकरवसुली करण्यासाठी तब्बल चार वेळा अभय योजना राबवून व्याज माफ केले. अनेकवेळा नोटिसा बजावल्या, तरीही करवसुलीला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. महापौर मीना आयलानी यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढून मालमत्ताकर भरण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. मात्र, स्वत: महापौर आणि त्यांच्या मुलाकडेच हजारो रु पयांची थकबाकी असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.शहरात व्यावसायिक आणि घरगुती मालमत्ताकर बुडवणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. मालमत्ताजप्तीच्या नोटिसा बजावल्या. काहीवेळा जप्तीची कारवाईही झाली. एवढेच नव्हे तर सरकारची अभय योजना तब्बल चारवेळा राबवली, मात्र तरीही नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही. महापौर आयलानी या स्वत:च वेळेवर कर भरत नसल्याची बाब समोर आली आहे. महापौर यांचे पुत्र धीरज यांच्याकडेही अनेक वर्षांची थकबाकी आहे. आयलानी यांचे सचदेव कॉम्प्लेक्स या इमारतीत पहिल्या मजल्यावर चॉइस कलेक्शन हे दुकान आहे. या मालमत्तेला व्यावसायिककर लागू असून दोन वर्षांपासून ३१५८९ रु पये थकबाकी आहे, तर मुलगा धीरज याचेही याच इमारतीत दुकान आहे. या दुकानाची ५७३१७ रुपये थकबाकी आहे.मागील तीन वर्षांपासून धीरजने मालमत्ताकर भरलेला नसल्याचे उघडकीस आले आहे. कर बुडवणाºयांच्या यादीत राजकीय नेत्यांनी भलीमोठी यादी आहे. यात उपमहापौर जीवन इदनानी यांच्या मालमत्तेवरही काही महिन्यांपूर्वी कारवाई झाली होती. आता या यादीत महापौरांचे नावही सामील झाल्याने या पदाचा अवमान झाल्याची प्रतिक्रि या शहरात व्यक्त केली जात आहे.