शहरं
Join us  
Trending Stories
1
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
2
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
3
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
5
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
6
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
7
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
8
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
9
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
10
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
11
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
12
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
13
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
14
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
15
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
16
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
17
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
18
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
19
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
20
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी

महापौर चषक सायकल स्पर्धा आज ठाण्यात रंगणार

By admin | Published: February 07, 2016 12:36 AM

ठाणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या कला-क्र ीडा महोत्सवांतर्गत ठाणे महापौर चषक सायकल स्पर्धा रविवारी सकाळी ६ वाजता तीनहात नाका येथून सुरू होणार

ठाणे : ठाणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या कला-क्र ीडा महोत्सवांतर्गत ठाणे महापौर चषक सायकल स्पर्धा रविवारी सकाळी ६ वाजता तीनहात नाका येथून सुरू होणार असल्याची मांिहती महापौर संजय मोरे यांनी दिली. सायकल स्पर्धेच्या कालावधीत या भागातील वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. महिला व पुरुष (खुली) ७० किमीची सायकल स्पर्धा असून पुरुष व महिला (हौशी) २२ किमीची सायकल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांची वैद्यकीय चाचणी शनिवारी दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे होणार आहे. ठाणे महापालिकेतर्फे प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेतील स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे. महिला व पुरुष (खुल्या) ७० किमी सायकल स्पर्धेचा प्रारंभ तीनहात नाका (उजवीकडील रस्ता) येथून होणार आहे. एलआयसी टर्मिनल, नितीन कंपनी उड्डाणपूल, ज्युपिटर हॉस्पिटल, गोल्डन डाइज जंक्शन उड्डाणपूल, माजिवडा पेट्रोलपंप उड्डाणपूल, विहंग हॉटेल सिग्नल, मानपाडा उड्डाणपूल, ब्रह्मांड नाका सिग्नल, पातलीपाडा उड्डाणपूल, पुढे निमुळता रस्ता, वाघबीळ उड्डाणपूल, कॉसमॉस, डी-मार्ट सिग्नल, आनंदनगर सिग्नल, कासारवडवली यू टर्न पॉइंट, कापूरबावडी उड्डाणपूल, ईस्टर्न एक्स्प्रेस हाय वे वरून सरळ, नितीन कंपनी उड्डाणपुलामार्गे परत तीनहात नाकामार्गे अशा तीन फेऱ्या पूर्ण करतील. अंतिम रेषा ही शेवटच्या फेरीत तीनहात नाका असणार आहे.वाहतुकीत बदल दरम्यान, सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत या कालावधीत या मार्गातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. मुंबईकडून नाशिक व घोडबंदरच्या दिशेने, माजिवडा उड्डाण ब्रिजवरून जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ज्युपिटर हॉस्पिटलच्या पुढे उड्डाणपुलावर चढणी ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग मुंबईकडून नाशिक, घोडबंदरच्या दिशेने माजिवडा उड्डाण ब्रिजवरून जाणारी सर्व प्रकारची वाहने ही कॅडबरी ब्रिज व माजिवडा ब्रिजखालून इच्छितस्थळी जातील. घोडबंदर व बाळकुमकडून मुंबई व नाशिककडे माजिवडा उड्डाण ब्रिजवरून जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना उड्डाणपुलाच्या चढणीच्या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग घोडबंदरकडून मुंबई व नाशिककडे माजिवडा उड्डाण ब्रिजवरून जाणारी सर्व प्रकारची वाहने ही सदर ब्रिजखालून कापूरबावडी सर्कल, गोल्डन क्रॉस व माजिवडा येथून इच्छितस्थळी जातील. घोडबंदर व बाळकुमकडून तत्त्वज्ञान सिग्नल येथून तुळशीधाम, वसंत विहारकडे जाणाऱ्या अथवा यू टर्न घेऊन जाण्यास तत्त्वज्ञान सिग्नल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्गे ही वाहने सरळ कापूरबावडी सर्कल उड्डाण ब्रिजच्या खालून उजव्या बाजूने यू-टर्न घेऊन इच्छितस्थळी जातील. ठाणे-मुंबईकडून तत्त्वज्ञान सिग्नल येथून यू-टर्न घेऊन कापूरबावडी सर्कलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना तत्त्वज्ञान सिग्नल येथे यू-टर्न घेऊन जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे. तुळशीधाम, वसंत विहारकडून तत्त्वज्ञान सिग्नल येथून कापूरबावडी सर्कल, ठाणे-मुंबईकडे जाणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना तत्त्वज्ञान सिग्नलवर प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने तत्त्वज्ञान सिग्नल येथून वळून घोडबंदरमार्गे मानपाडा ब्रिजखालून उजव्या बाजूने वळून इच्छितस्थळी जातील. नाशिककडून मुंबईच्या दिशेने माजिवडा उड्डाणपुलावरून जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांस रुस्तमजीच्या पुढे उड्डाणपुलावर चढणी ठिकाणी प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे. ही वाहने ही ब्रिजच्या खालून इच्छितस्थळी जातील.हौशी सायकलपटूंसाठीही स्पर्धाया स्पर्धेचा प्रारंभ तीनहात नाका, एलआयसी टर्मिनल, नितीन कंपनी उड्डाणपूल, ज्युपिटर हॉस्पिटल, गोल्डन डाइज जंक्शन उड्डाणपूल, माजिवडा पेट्रोलपंप उड्डाणपूल, विहंग हॉटेल सिग्नल, मानपाडा उड्डाणपूल, ब्रह्मांड नाका सिग्नल, पातलीपाडा उड्डाणपूल, पुढे निमुळता रस्ता, वाघबीळ उड्डाणपूल, कॉसमॉस डी-मार्ट सिग्नल, आनंदनगर सिग्नल, कासारवडवली यू टर्न पॉइंट, कापूरबावडी उड्डाणपूल, ईस्टर्न एक्स्प्रेस हाय वे वरून सरळ, नितीन कंपनी उड्डाणपूल असा मार्ग असून अंतिम रेषा ही तीनहात नाका आहे.