ठाणे : ठाणे महानगरपालिका आयोजित कला-क्रीडा महोत्सव २०१६ अंतर्गत २८ व्या ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक व महिला गट कबड्डी स्पर्धांचा शुभारंभ सोमवारी झाला. यावेळी झालेल्या पुरुष साखळी सामन्यांमध्ये ठाणे शहर पोलीस विरुद्ध महाडीक उद्योग समूह कोल्हापूर यांच्यात झालेल्या लढतीत ठाणे शहर पोलीस संघ ६ गुणांनी विजयी झाला. परबवाडी शिवसेना शाखेजवळील जुन्या ज्ञानसाधना महाविद्यालया शेजारी असलेल्या मैदानात या स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या व खा. राजन विचारे यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर संजय मोरे, आमदार प्रताप सरनाईक, उपमहापौर राजेंद्र साप्ते, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष/नगरसेवक अशोक वैती, आदींसह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. स्थानिक नगरसेवक व स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापौर चषक कबड्डी स्पर्धा संपन्न होत आहे. महिला संघांमध्ये झालेल्या सहा सामन्यांत संघर्ष क्र ीडा मंडळ उपनगर मुंबई विरुद्ध क्रातींवीर भगत मंडळ रायगड यांच्यात चुरस होऊन १५ गुणांनी संघर्ष क्र ीडा मंडळ विजयी झाले. प्रेरणा क्र ीडा मंडळ ठाणे विरु द्ध महात्मा फुले मुंबई उपनगर यांच्यातील लढतीत १ गुणाने महात्मा क्रीडा मंडळ मुंबई उपनगर विजयी झाले. पोईसर जिमखाना मुंबई व होतकरु मंडळ ठाणे यांच्यातील लढतीमध्ये ८ गुणांनी होतकरु क्र ीडा मंडळ विजयी झाले. राजश्री शाहू कोल्हापूर विरुध्द वाघेश्वरी पुणे यांच्यातील लढतीत ६ गुणांनी वाघेश्वरी पुणे संघ विजयी झाला. पुरुष साखळी सामन्यांमध्ये ठाणे शहर पोलीस विरुद्ध महाडीक उद्योग समुह कोल्हापूर यांच्यातील लढतीमध्ये ठाणे शहर पोलीस संघ ६ गुणांनी विजयी झाला. सेंट्रल बँक आॅफ इंडिया विरु द्ध मुंबई पोट्र ट्रस्ट या लढतीत मुंबई पोर्ट १५ गुणांनी विजयी झाला. नवी मुंबई पोलीस विरु द्ध पुणे शहर पोलीस यांच्या चुरशीच्या लढतीत पुणे शहर पोलीस २ गुणांनी विजयी झाला. जॉय इंटरप्रायजेस विरु द्ध मुंबई पोलीस या लढतीमध्ये पोलिसांनी सहज विजय मिळविला.
महापौर चषक कबड्डी स्पर्धांना झाली सुरवात
By admin | Published: February 03, 2016 2:09 AM