ठाणे : येत्या १३ आॅगस्ट रोजी होणाºया २८ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत यंदाही टाईम टेक्नॉलॉजीचा वापर २१ कि.मी. पुरूष आणि १५ कि.मी. महिलांच्या गटासाठी करण्यात येणार आहे. ही स्पर्धा ‘रन फॉर स्मार्ट सिटी’ या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धावपटूंसह जवळपास २० हजार स्पर्धक यात सहभागी होतील, असा विश्वास महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.यावेळी उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, गटनेते दिलीप बारटक्के, भाजपा गटनेते मिलिंद पाटणकर नगरसेवक राम रेपाळे, संजय वाघुले, संतोष वडवले, उपायुक्त संदीप माळवी, क्र ीडा अधिकारी मीनल पालांडे आदी उपस्थित होते. १३ आॅगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजता महापालिका मुख्यालय चौकातून या स्पर्धेला सुरवात होणार आहे. ही स्पर्धा विविध ११ गटांत घेण्यात येणार असून पहिल्या तीन गटातील स्पर्धा महाराष्ट्र राज्यस्तरावर असून, पुरूष २१ कि.मी स्पर्धेतील विजेत्यांसाठी पहिले बक्षीस ७५ हजार रुपये, दुसरे बक्षीस ४५ हजार रु., तिसरे बक्षीस ३० हजार रु., चौथे १२ हजार रु. अशी आहेत. त्या शिवाय ५ ते १० पर्यतच्या विजेत्यांसाठीही आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. पुरुष गटाची ही स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार असून याच ठिकाणी समाप्त होणार आहे. महिला १५ कि.मी स्पर्धेसाठी पहिले बक्षीस ५० हजार रुपये, दुसरे ३० हजार रु., तिसरे १५ हजार रु., चौथे १० हजार रु. अशी असून ५ ते १० पर्यतच्या विजेत्यांनाही आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहे. महिलांची ही स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार असून हिरानंदानी इस्टेट येथे समाप्त होणार आहे. १८ वर्षावरील १० कि.मी.ची स्पर्धा खारीगांव ते कोपरी मार्गे महापालिका भवन अशी असणार आहे. चौथा गट हा १८ वर्षाखालील मुलांसाठी असून ही स्पर्धा १० कि.मी अंतराची असेल.ठाणे जिल्ह्यासाठी मर्यादीत १५ वर्षाखालील मुलामुलींसाठी ५ किमी अंतराची स्पर्धा ठेवण्यात आली आहे. या दोन्ही गटातील स्पर्धेची सुरूवात महापालिका भवन येथे होऊन शेवट माँसाहेब मीनाताई ठाकरे चौक येथे होणार आहे. तसेच १२ वर्षाखालील मुलांमुलीसाठी ३ कि.मी अंतराची स्पर्धा असणार आहे. या गटातील स्पर्धा महापालिका भवन, पाचपाखाडी येथे सुरू होऊन ती परत महापालिका भवन येथे संपणार आहे.२ किमी.ची रन फॉर फन यंदाही २ कि.मी ‘रन फॉर फन’ ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत महापालिका कर्मचारी तसेच पत्रकारांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापौरानी केले आहे. या स्पर्धेसाठी एकूण २२१ पंच, ९२ पायलट, २१० सुरक्षा रक्षक, शेकडो स्वयंसेवक आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेत आहेत. या स्पर्धेसाठी महापालिकेने विविध सेवा उपलब्ध करुन दिल्या.त्यामध्ये स्पर्धकांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी, स्पर्धेच्या मार्गावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन सेवा पथके, तत्काळ वैद्यकीय सेवा, प्रशिक्षित डॉक्टर व परिचारिकांसह रुग्णवाहिका, स्पर्धेच्या मार्गावर विविध टप्प्यांवर प्राथमिक उपचार केंद्रे उपलब्ध होणार आहेत. या शिवाय मॅरेथॉन स्पर्धकांसाठी ठाणे परिवहन सेवेतर्फे मोफत बस सेवेची सुविधा उपलब्ध असणार आहे.ज्येष्ठ नागरिक, महिलाव पुरूष वेगळा गटठाणे जिह्यासाठी मर्यादीत ज्येष्ठ नागरिक ६० वर्षावरील महिला व पुरु षासाठी वेगळा गट असून या गटातील पहिल्या पाच विजेत्यांसाठी रोख बक्षीसे आणि मानचिन्ह देण्यात येणार आहेत. महापालिका ते बाटा शोरुम (नितीन कंपनी) अशी अर्धा कि.मी ची ही स्पर्धा असणार आहे.
१३ आॅगस्टला महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:20 AM