शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

महापौर तुमचा... बुलडोझर सोडा, सायकल पण फिरकली नाही - भाऊसाहेब चौधरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 5:10 PM

शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील उर्सेकरवाडी, पाटकर रोड डॉ. राथ रोड आदी ठिकाणी फेरिवाला प्रश्न जटील झाला असून आता तर त्याने स्कायवॉकवरही ठाण मांडले आहे.

डोंबिवली: शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील उर्सेकरवाडी, पाटकर रोड डॉ. राथ रोड आदी ठिकाणी फेरिवाला प्रश्न जटील झाला असून आता तर त्याने स्कायवॉकवरही ठाण मांडले आहे. त्यामुळे स्टेशन परिसरातून मार्ग काढतांना नागरिकांची गैरसोय होते. यासंदर्भात महापौर राजेंद्र देवळेकरांनी तीन महिन्यांपूर्वी वस्तूस्थिती बघितली होती, त्यावर तातडीची उपाययोजना म्हणुन बुलडोझर फिरवणार असे सांगितले होते, पण प्रत्यक्षात तीन महिन्यात बुलडोझर सोडा पण समस्या सोडवण्यासाठी साधी सायकलही फिरकलेली नाही. शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी अशा आशयाचे खरमरीत पत्र देवळेकरांना लिहीले आहे.फेरिवाला प्रश्न जटील झाला असून त्यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. ‘लोकमत’च्या हॅलो ठाणेमधील वृत्ताचा आधार घेत चौधरी यांनी देवळेकरांना पत्र दीले. गणेशोत्सवात या ठिकाणी आग लागली होती, त्या ठिकाणी अग्नीशमन दलाच्या गाड्या जाण्यासाठी फेरिवाल्यांसह दुकानांच्या अतिक्रमणामुळे अडचण झाली होती याचीही आठवण त्यांनी करुन दिली.स्टंट नको कार्यवाही कराफेरिवाला प्रश्नावरुनच भाजपच्या नगरसेवकांनी ग प्रभागक्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांना धारेवर धरले. मंगळवारी लोकमतच्या वृत्ताची दखल घेत स्विकृत नगरसेवक राजन सामंत, संदीप पुराणिक, राजन आभाळे, फ प्रभाग समितीच्या सभापती खुशबु चौधरी, माजी सभापती मुकुंद पेडणेकर आदींच्या शिष्ठमंडळाने कुमावत यांची भेट घेत त्यांना फेरिवाले हटवण्यासंदर्भात चर्चा केली. स्टंट नको कार्यवाही कायमस्वरुपि हवी अशी मागणी सभापती चौधरी यांनी केली. तर सारखे का यावे लागते असा सवाल सामंत यांनी केला. या शिष्ठमंडळाने रेल्वे स्थानक प्रबंधक ओमप्रकाश करोटीया यांचीही भेट घेतली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाहणीदरम्यान केलेल्या सूचनांनूसार उद्घोषणा यंत्रावरुन मधल्या पादचारी पुलाचा जास्त वापर करावा असे आवाहन सुरु आहे. कल्याणसह मुंबईकडील पादचारी पूलावर फेरिवाले नकोत त्याची अंमलबजावणी झाली असल्याचे संदीप पुराणिक म्हणाले.दरम्यान, स्कायवॉकवर महापालिकेच्या कर्मचा-यांची ड्यूटी रात्री ९ पर्यंत असते.त्यानंतर रात्री उशिरापर्यंत फेरिवाले येत असतील तर त्याबद्दल माहिती घ्यावी लागेल. त्यातच या प्रभागात फेरिवाला कारवाई पथक प्रमुख नाही, कर्मचा-यांचा तुटवडा असल्याने गंभीर समस्या असल्याचे स्पष्टीकरण प्रभागक्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांनी भाजपच्या नगरसेवकांना दिले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली