ठाणे : महासभेत मनमानी पद्धतीने हजेरी लावणा-या लेटलतिफ नगरसेवक, अधिका-यांना अंकुश लावण्याकरिता महासभा वेळेवर सुरु करण्याच्या महापौरांच्या प्रस्तावाला सत्ताधारी शिवसेना नगरसेवकांनीच मंगळवारी हरताळ फासला. सोमवारची खंडित सभा मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता सुरु करण्याकरिता महापौरांनी स्वत: वेळेवर हजर झाल्या व त्यांनी महासभा सुरु केली. मात्र शिवसेनेचेच बहुतांश नगरसेवक सभागृहात वेळेवर उपस्थित नसल्याचे दिसून आले. त्यामुळे महापौरांच्या सूचना व आदेश स्वपक्षातील नगरसेवक जुमानत नसल्याची कुजबूज अधिकारी वर्गात सुरु होती.सोमवारी महासभा तब्बल दोन तास उशिरा सुरु झाल्याने हा मुद्दा चांगलाच गाजला होता. सभागृहात उशिरा आलेल्या महापौरांनी महासभा उशिरा सुरु होण्याकरिता जबाबदार कोणत्याही पक्षाचे नाव न घेता लेटलतिफ लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांचा चांगलाच समाचार घेतला होता. काही नगरसेवक महासभा संपत असताना येतात तर काही नगरसेवक थेट सचिव विभागात जाऊन सही करतात, अशी खळबळजनक माहिती त्यांनी सभागृहात दिली. लेटलतिफांवर अंकुश लावण्यासाठी महासभेचे रजिस्टर महासभा सुरु झाल्यानंतर केवळ एक ते दीड तास ठेवण्यात यावे त्यानंतर मात्र कोणालाही सही करायला मिळणार नाही असे आदेश महापौरांनी दिले होते.महापौरांच्या निर्णयाची अंमलबजावणी सर्वप्रथम सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी करणे अपेक्षित होते. मात्र विरोधी पक्षातील नगरसेवकांपेक्षा सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक मंगळवारी सभागृहात उशिरा हजर झाले. साडेअकराला महापौरांनी महासभा सुरु केल्यानंतर शिवसेनेचे काही नगरसेवक साडेबारापर्यंत सभागृहात उपस्थित नव्हते.मी घेतलेल्या चांगल्या निर्णयाची सुरु वात माझ्यापासून झाली पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी आमच्या नगरसेवकांनी केली पाहिजे, असे आवाहन सोमवारी महापौरांनी केले होते. मात्र मंगळवारी नेमके चित्र उलटे बघायला मिळाले. नगरसेवक सभागृहात उशीरा हजर झाले.>सभा संपेतो मस्टर सभागृहातचमहासभा सुरु झाल्यानंतर हजेरी मस्टर एक ते दीड तासाने हलवण्यात यावे, असे आदेश महापौरांनी दिले होते. परंतु मंगळवारी महासभा संपेपर्यंत हजेरी मस्टर सभागृहातच होते.>नौपाड्यात भिकारी, गर्दुल्ले यांना रात्र निवारा ?ठाणे : बेघरांसाठी नौपाड्यातील भर वस्तीत रात्र निवारे उभारण्याचा घाट महापालिका अधिकाºयांनी घातला आहे. आरोग्य केंद्रासाठी आरक्षित असलेल्या इमारतीत हे निवारे दिले जाणार असून येथे परिसरातील भिकारी, गर्दुल्ले आणि अन्य गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढण्याची शक्यता असल्याने त्याला स्थानिकांनी विरोध केला आहे. या मुद्यावरुन मंगळवारी महासभेत स्थानिक नगरसेवक आक्रमक झाले आणि त्यांनी पालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा निषेध केला. सर्वोच्च न्यायालयाने बेघरांसाठी रात्र निवारे उभारण्याचे आदेश पालिकांना दिले आहेत. परंतु, दिलेल्या मुदतीत पालिकेला हे निवारे उभारण्यात यश आलेले नाही. कोपरी येथे रात्र निवारे उभारण्याकरिताकेंद्र सरकारचे दोन कोटी रुपये अनुदान दिले असून पालिकेनेही ९४ लाखांंचा निधी उपलब्ध केला आहे. मात्र, त्याला आणखी काही महिने विलंब लागणार आहे. यामुळे न्यायालयात पालिकेची पंचाईत होणार असल्याचे लक्षात येताच घाईगडबडीत नौपाड्यातील सोनी पथावर असलेल्या पालिकेच्या इमारतीत हा रात्र निवारा उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. परंतु पालिकेच्या या निर्णयाविरोधात तीव्र पडसाद उमटले. सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्यासह स्थानिक नगरसेवक संजय वाघूले, सुनेश जोशी आणि मृणाल पेंडसे यांनी स्थानिकांची सुरक्षितता धोक्यात येईल, असे सांगत या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. भाजपाचे दिवंगत नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने ही रात्र निवारा योजना देशभरात राबवली जात असून आरोग्य केंद्रासाठी आरक्षित जागेत असे निवारा केंद्र सुरू करणे योग्य नसल्याचे मत वाघूले यांनी व्यक्त केले. काही महिन्यांपासून या भागात फुगे विक्रेत्यांचा हैदोस सुरू असून झाडांवर चढून ही मंडळी लोकांच्या घरात डोकावतात. त्यांच्यावर आम्ही नुकतीच कारवाई केली. हीच मंडळी आता रात्र निवाºयांमध्ये आसरा घेणार असल्याने स्थानिकांत तीव्र असंतोष असल्याचे जोशी म्हणाले तर, स्टेशन परिसरात असंख्य भिकारी, गर्दुल्ले आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांचा वावर असतो. त्यांना नौपाड्यातील रात्र निवारा सोईचा ठरणार असल्याने ही गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळी तेथे येऊन स्थानिकांना उपद्रव करतील, असे म्हस्के म्हणाले. रात्र निवारा ज्या जागेवर उभारण्याचा प्रयत्न सुरु आहे त्या जागेवर मुळात आरोग्य केंद्र होणे अपेक्षित असून तेथे वृध्दाश्रम सुरू करावा या १० वर्षांपूर्वी मांडलेल्या प्रस्तावाचा प्रशासन कोणताही पाठपुरावा करत नाही. नौपाड्यात रात्र निवारा सुरू करण्यास स्थानिकांचा विरोध असला तर तो सिव्हील हॉस्पिटलमध्ये सुरू करावा अशी सूचना सेनेचे नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी केली तर, कळवा रुग्णालयात रात्र निवारा केंद्र सुरू करणे सोईचे ठरेल, असे मत राष्ट्रवादीच्या मुकुंद केणी यांनी मांडले. तात्पुरत्या स्वरु पात हा रात्र निवारा उभारणार असल्याचे स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिले. मात्र, कोपरीतील इमारत पूर्ण होण्यास दोन ते तीन वर्षे जाणार आहेत.>केवळ कला, क्रीडेसाठीच द्या गावदेवी; सदस्यांनी मांडली खेळाडूंची व्यथाठाणे : स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरील गावदेवी मैदान हे यापुढे केवळ क्रीडा प्रकारांसाठी उपलब्ध करुन द्यावे. प्रदर्शन आणि इतर कार्यक्रमांसाठी मैदान भाड्याने दिल्याने खेळाडूंचा हिरमोड होत असल्याचा मुद्दा भाजपाचे नगरसेवक संजय वाघुले यांनी मंगळवारी महासभेत उपस्थित केला. वाघुले यांच्या मागणीला पाठिंबा देत यापुढे हे मैदान केवळ कला आणि क्रीडा प्रकारांसाठीच दिले जावे, असे आदेश पीठासीन अधिकारी तथा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले. ठामपाच्या वतीने शहरातील १० खेळांच्या मैदानात आवश्यक त्या स्थापत्य व इतर सोयीसुविधा पुरविण्यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता. या प्रस्तावावरील चर्चेत सत्ताधारी तसेच विरोधी बाकावरील नगरसेवकांनी शहरातील सर्वच मैदानांकडे लक्ष देण्याची मागणी केली. मराठी शाळांसाठी असलेल्या मैदानांची अवस्था अत्यंत वाईट असून त्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी उमेश पाटील आणि सुधीर कोकाटे यांनी केली. सुहास देसाई यांनी नौपाड्यातील मैदानाचा भुखंडावर अतिक्रमण झाल्याकडे लक्ष वेधले. तसेच कोपरीतील गावदेवी मैदानाच्या दुरवस्थेचा मुद्दा मालती पाटील यांनी उपस्थित केला. वागळे इस्टेट भागातील एमआयडीसीच्या जागेवर असलेल्या मैदानासाठी पालिकेने ७२ लाख भरले आहेत. परंतु अद्यापही ते मैदान ताब्यात का घेतले गेले नाही, असा सवाल सदस्य एकनाथ भोईर यांनी उपस्थित केला तर दादोजी कोंडदेव क्रीडागृहाच्या दुरवस्थेचा पाढा विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी वाचला. येथील गवत वाढलेले असून अॅथलेटीक्स खेळण्यासाठी येणाºया खेळाडंूचे हाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. येथील सिंथेटीक ट्रॅकची तर फारच दैना झाली आहे. त्यामुळे आधी या क्रीडागृहासाठी प्राथमिक सुविधा द्या मगच येथे रणजीचे सामने खेळवा, असा टोला त्यांनी प्रशासनाला लगावला. भाजपा नगरसेवक कृष्णा पाटील यांनी स्टेडीअम केवळ क्रीडा प्रकारासांठीच द्यावे, या ठिकाणी रणजी सामने खेळले जाऊ नये, अशी मागणी लावून धरली. परंतु त्यांचे प्रशासनाने समाधान केल्याने त्यांनी आपली मागणी मागे घेतली. दरम्यान, गावदेवी मैदान हे मोकळे झाल्यानंतरही ते खेळासाठी उपलब्ध नसते, येथे प्रदर्शन आणि इतर कार्यक्रमच होत असल्याचा मुद्दा वाघुले यांनी मांडला. हे मैदान केवळ क्रीडा प्रकारांसाठीच उपलब्ध असावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यानुसार यापुढे हे मैदान केवळ कला आणि क्रीडा प्रकारांसाठीच उपलब्ध असेल, असे आदेश महापौर शिंदे यांनी दिले.>आरक्षित भूखंडांना कंपाऊंड घाला- महापौरांचे आदेशठाणे : ठाणे महापालिकेच्या आरक्षित भूखंडांवरील अतिक्र मणाचा मुद्दा मंगळवारी महासभेत चांगलाच गाजला. अतिक्र मण होऊ नये याकरिता या भूखंडांना कंपाऊंड बांधण्याबरोबरच कोणत्या कारणांसाठी या जागा आरक्षित आहेत त्याचे फलक लावण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी प्रशासनाला दिले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आरक्षित भूखंडावर अतिक्र मण होत असून त्यानंतर याच लोकांचे पुनर्वसन करण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या एकूण ८१३ भूखंडांपैकी तब्बल २२१ भूखंड अतिक्र मणाने बाधित असल्याची धक्कादायक माहिती आहे. आरक्षित भूखंडापैकी अवघी २४९ आरक्षणे अंशत: किंवा पूर्णत: संपादीत करण्यात आले आहेत. परिणामी जवळपास अर्धे आरक्षित भूखंड अद्याप संपादीतच करण्यात आलेले नाहीत. राष्ट्रवादी नगरसेवक सुहास देसाई यांनी हा मुद्दा उपस्थित केला व सखोल चौकशीची मागणी केली. अतिक्रमण झालेले भूखंड तत्काळ ताब्यात घेण्याची मागणी केली. विकास आराखड्यातील २२१ आरक्षित भूखंडावर अनधिकृत बांधकामे असून २१ डिसेंबर १९९१ पासून २०१० या दरम्यान ही बांधकामे झाल्याचे सर्वेक्षणात उघड झाले आहे. दुसरीकडे
महापौरांच्या आदेशाला नगरसेवकांकडूनच हरताळ, खुद्द शिवसेनेकडूनच आदेश धाब्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 3:28 AM