मुंब्रा : अतिवृष्टीमुळे कोकणात अनेक ठिकाणी पूर आला होता. त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. ठिकठिकाणी चिखल आणि इतर टाकाऊ वस्तूंचा खच पडला आहे. यामुळे तेथे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास तेथील नागरिकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड तसेच राकाँपाच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शखाली ठामपाच्या परिवहन समितीचे सदस्य शमिम खान तसेच विरोधी पक्षनेते अशरफ ऊर्फ शानू पठाण यांनी वैद्यकीय साधनांनी सुसज्य अशा रुग्णवाहिकेसह डाॅक्टरांची १२ पथके तसेच इतर जीवनावश्यक वस्तू मंगळवारी दुपारी पूरग्रस्तांसाठी कोकणात रवाना केल्या. यावेळी पक्षाचे नगरसेवक तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय पथक रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:42 AM