भिवंडी : शहरातील यंत्रमाग कामगारांसाठी भिस्सी (खाणावळ)चालविणाऱ्या खलील सरदार व त्यांच्या चार मुलांनी मिळून जैतुनपुरा भागात भिस्सीच्या व्यवसायाआड नशेची औषधे व शस्त्रविक्री सुरू केल्याने त्यांच्यावर पोलीसांनी कारवाई करीत चार भावांना अटक केली. तर त्यांच्या भिस्सीत टाकलेल्या छाप्यात गावठी पिस्तोलासह धारदार सुरे,चाकू व नशेच्या गोळ्यांचा साठा मिळाला असून या प्रकरणी पोलीसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.शहरातील जैतुनपूरा भागात आपल्या घरांत वडील व चार मुलांनी मिळून कामगारांसाठी भिस्सी व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय करताना ते कामगारंना नशेच्या गोळ्या व घातक शस्त्रे विक्री करू लागले होते. त्यामुळे या परिसरांत त्यांची दहशत निर्माण झाली होती. या बाबत परिसरांतील नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत पोलीसांनी सदर भिस्सीमध्ये छापा टाकला असता तेथे सापडलेले गावठी पिस्तोल,सहा जिवंत काडतूस, पाच सुरे, एक तलवार,नशेच्या गोळ्या ,गुठका व ७४ हजार रूपयांची रोख रक्कम असा एकुण ८६ हजार ६६६ चा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी नईम खलील मोमीन(३३),नदीम उर्फ आयबा खलील मोमीन(२५), वसीम खलील मोमीन(२८), कलीम खलील मोमीन(२६) या चार भावांना अटक केली आहे.तर त्यांचे वडील खलील सरदार उर्फ ताजीयावाले मोहम्मद बशीर मोमीन हे फरार आहेत. पोलीसांनी अटक केलेल्या चार भावांना मंगळवार रोजी भिवंडी न्यायालयांत हजर केले असता त्यांना १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
भिस्सीच्या व्यवसायाआड नशेची औषधे व शस्त्रविक्री, चार भावांना केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 9:07 PM
भिवंडी : शहरातील यंत्रमाग कामगारांसाठी भिस्सी (खाणावळ)चालविणाऱ्या खलील सरदार व त्यांच्या चार मुलांनी मिळून जैतुनपुरा भागात भिस्सीच्या व्यवसायाआड नशेची ...
ठळक मुद्देशहरातील जैतुपूरा भागात भिस्सीमध्ये सापडली शस्त्रेनशेसाठी मेडीसीनच्या गोळ्यांची व गुठक्याची विक्रीभिस्सी मालकाचे चार मुलांना अटक व मालक फरार