शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे आणि मी एकत्र आलो तर..."; स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजेंचं मोठं विधान
2
उद्धव ठाकरेंवर 'अँजिऑप्लास्टी'; ब्लॉकेज आढळल्यानं लगेचच शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला
3
बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; 'ते' सहा जण कोण? पुणे कनेक्शनही समोर
4
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेतून स्टार खेळाडूची माघार
5
बांगलादेश भारताविरोधात इंटरपोलकडे धाव घेणार, तर समुद्रात चीनसाठी घातल्या पायघड्या
6
SBI मध्ये मेगा भरती, अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस; पगार तब्बल 25.75 लाख रुपये...
7
वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरचे वडील विधानसभेच्या रिंगणात?; भाजपकडून लढण्यास इच्छुक
8
सलमान खान, सगुनप्रीत सिंह, कौशल चौधरी, कोण आहेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर?
9
Paytm Share Price : 'या' शेअरनं ९० दिवसांत दिला ७१% रिटर्न, आता Mutual funds नं वाढवली गुंतवणूक 
10
Video: Elon Musk चा मोठा कारनामा; जगातील सर्वात मोठ्या रॉकेटची यशस्वी लँडिंग
11
“हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊ नका”; आता काँग्रेस आमदाराची मागणी, पण कारण काय?
12
आत्मविश्वासाची कमी अन् ऑस्ट्रेलियाची भीती; पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती
13
"समाजातील रावण...", दसऱ्याला अनोखं दहन; महिलेने जाळला नवरा, सासू-सासऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा
14
महायुतीच्या घोषणांना काँग्रेस जोरदार उत्तर देणार; महाराष्ट्रासाठी जाहीरनाम्यात ३ मोठी आश्वासने असणार?
15
पृथ्वी शॉ,अजिंक्य अन् अय्यरचा फ्लॉप शो; पांड्याच्या संघानं मुंबईला दिला पराभवाचा धक्का!
16
Gold Silver Price : दिवाळीपूर्वी सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर; चांदीची चमकही वाढली; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट दर 
17
4G, 5G नंतर, भारत आता 6G च्या शर्यतीत, टॉप 6 देशांमध्ये मिळवले स्थान
18
म्हणून आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी राजकुमार राव करतो उपवास! कारण ऐकून थक्क व्हाल
19
इतर राज्यातून येऊन मुंबईत दादागिरी खपवून घेणार नाही; CM एकनाथ शिंदेंचा इशारा
20
टोल माफीनंतर एसटी प्रवाशांसाठी सरकारचा मोठा निर्णय; दिवाळीत मिळणार दिलासा

मीरा-भार्इंदरचा कौल : आयारामच ठरले निर्णायक, भाजपापाठोपाठ शिवसेनेवर ‘बाहेरच्यांचे’ वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 3:41 AM

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अनपेक्षित निकालात भाजपाने घेतलेली झेप ही २९ आयारामांच्या जिवावर असल्याचे प्रत्यक्ष यादीवरून स्पष्ट झाले आहे. यातील बहुतांश राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेतून आयात केलेले आहेत.

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अनपेक्षित निकालात भाजपाने घेतलेली झेप ही २९ आयारामांच्या जिवावर असल्याचे प्रत्यक्ष यादीवरून स्पष्ट झाले आहे. यातील बहुतांश राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेतून आयात केलेले आहेत.शिवसेनेचे सदस्य २२ असले तरी त्यातील १२ नगरसेवक हे बाहेरून आलेले; तर काँग्रेसच्या १२ पैकी चार नगरसेवक हेही अन्य पक्षांमधील आहेत. त्यामुळे भाजपा, शिवसेना, काँग्रेस या प्रमुख पक्षांचा विजय हा पक्षापेक्षा निवडून येण्याच्या क्षमतेचा विजय असल्याचे दिसून आले.भाजपाच्या २९ आयात विजयी नगरसेवकांपैकीसर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यातील अशोक तिवारी, ध्रुवकिशोर पाटील, सुरेश खंडेलवाल, वंदना मंगेश पाटील, परशुराम म्हात्रे नगरसेवक होते. शिवाय राष्ट्रवादीतून आलेले चंद्रकांत वैती, ज्योत्स्रा हसनाळे, डॉ. प्रिती पाटील, अरविंद शेट्टी, दरोगा उर्फ पंकज पांडेय, अनिता मुखर्जी, नयना म्हात्रे, वीणा सूर्यकांत भोईर, सुजाता पारधी, दीपाली मोकाशी, हेमा बेलानी असे ११ जण आता नगरसेवक झाले आहेत.वीणा यांचे पती सूर्यकांत हे भुजबळ समर्थक म्हणून ओळखले जातात. उमेदवारीसाठी ते शिवसेनेत गेले, पण त्यांच्या पत्नीला भाजपाने तिकीट दिले. सुजाता पारधी यांचा भाऊ राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता. हेमा बेलानी यांचे पती राजेश राष्ट्रवादीत होते. अरविंद शेट्टी हे पूर्वी गिल्बर्ट मेन्डोन्सा समर्थक होते. प्रभात पाटील, शानू गोहिल, सुनिता भोईर यांनी कॉँग्रेसमधून येऊन भाजपाच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. यातील पाटील पाच वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या; तर गोहिल व भोईर या काँग्रेसच्या माजी नगरसेविका होत्या. अनिल विराणी, हेतल परमार, सचिन केसरीनाथ म्हात्रेदेखील काँग्रेसमधून आले आणि भाजपाचे नगरसेवक झाले. विराणी यांच्या पत्नी रेखा मागच्या वेळी काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. गेल्या निवडणुकीत भाजपाच्या गीता जैन यांच्यासमोर अपक्ष उमेदवार म्हणून लढलेल्या रीटा शहा यंदा भाजपातून निवडून आल्या. अपक्ष म्हणून मागील निवडणूक हरलेले गणेश शेट्टी, विनोद म्हात्रेदेखील भाजपाच्या कमळावर निवडून आले. मागील अपक्ष मुन्ना सिंग या वेळी भाजपाच्या तिकिटावर जिंकले; तर मनसेच्या तिकिटावर पराभूत झालेले जयेश भोईर यंदा भाजपाच्या पॅनलमधून निवडून आले. अ‍ॅड. रवी व्यास मागील निवडणुकीत राष्ट्रवादीतून जिंकले. दोन वर्षात ते भाजपात गेले. पोटनिवडणुकीत विजयी झाले होते. दरोगा पांडेय हे व्यास यांचेच समर्थक आहेत.संबंधित वृत्त/४काँग्रेसमध्ये चौघेकाँग्रेसमधूनही चौघे आयाराम निवडून आले असून गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक झालेले नरेश पाटील काँग्रेसमध्ये गेले आणि निवडून आले. शिवाय राष्ट्रवादीच्या पदाधिकारी रुबिना शेख, गेल्यावेळच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका शबनम लियाकत शेख यांचा दीर अमजद तसेच राष्ट्रवादीचे समर्थक केबल व्यावसायिक राजीव मेहरादेखील यंदा काँग्रेसमधून निवडणूक लढवून विजयी झाले.मूळच्या शिवसेनेची संख्या घटलीशिवसेनेनेमध्येही मोठ्या संख्येने आयाराम निवडून आले आहेत. शिवसेनेची सदस्यसंख्या गेल्यावेळच्या १४ वरून यंदा २२ झाली आहे. त्यातील १२ जण अन्य पक्षांतून आले असल्याने त्या पक्षाची मूळ संख्या आयारामांशी तुलना करता अवघी १० झाली आहे.त्यामुळे पक्षाच्या नगरसेवकांच्या गटावर आयारामांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या नगरसेवकांपैकी कॅटलीन परेरा, वंदना विकास पाटील, अनिता पाटील, हेलन जॉर्जी गोविंद, कमलेश भोईर हे निवडून आले आहेत.काँग्रेसमधून आलेले नगरसेवक दिनेश नलावडे व शर्मिला बगाजी, भाजपामधून आलेल्या नगरसेविका दिप्ती भट; तर माजी भाजपा नगरसेविका स्रेहा पांडे, बहुजन विकास आघाडीमधून आलेले नगरसेवक दाम्पत्य राजू आणि भावना भोईर; तसेच मनसेतून आलेल्या अर्चना अरुण कदमही शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर