शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

ठाण्यात पक्षिमित्रांचा मेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 6:27 AM

पक्ष्यांबाबत अधिकाधिक लोकांना माहिती मिळावी, तसेच प$$क्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धनाबाबत जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने भरविण्यात येणारे यंदाचे

स्नेहा पावसकर/ लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पक्ष्यांबाबत अधिकाधिक लोकांना माहिती मिळावी, तसेच प$$क्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धनाबाबत जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने भरविण्यात येणारे यंदाचे राज्यस्तरीय ३१ वे पक्षीमित्र संमेलन यंदा ठाण्यात आयोजिण्यात येणार आहे. २५-२६ नोव्हेंबर रोजी हे संमेलन रंगणार असून या संमेलनाच्या निमित्ताने ठाण्यात राज्यभरातील पक्षीमित्रांचा जणू मेळाच भरणार आहे.महाराष्ट्र पक्षी मित्र संस्थेच्यावतीने आणि होपच्या पुढाकाराने यंदाचे पक्षीमित्र संमेलन ठाण्यात होणार आहे. ग्रामीण भागात पक्ष्यांच्या विविध जाती, प्रकार पाहायला मिळतात. तसेच त्यांचे वास्तव्यही रानांमधील विविध झाडा-झुडुपांवर असते. त्यामुळे हे संमेलन बहुतांशी करू न ग्रामीण भागात आयोजिले जाते. यंदा शहरातील पक्षी आणि येथील वातावरणाचा त्यांच्यावर होणार परिणाम आणि त्यादृष्टीने त्यांचे आवश्यक असलेले संरक्षण आणि संवर्धन याबाबत चर्चा आणि मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हे संमेलन ठाणे शहरात आयोजिले आहे. मार्गदर्शनपर व्याख्याने, चर्चासत्र, प्रेझेंटेशन, नेचर ट्रेल अशा विविध सत्रांनी हे संमेलन रंगणार आहे. संमेलनात विविध पक्ष्यांच्या जाती-प्रजातींची माहिती, त्यांच्या संवर्धनाबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच पक्ष्यांचे आरोग्य आणि वातावरण यावर वैज्ञानिक दृष्टया आधारीत चर्चासत्र होणार आहे. तसेच पक्षीतज्ज्ञ किंवा पक्षीमित्र यांनी आपल्या कॅमेऱ्यातून टिपलेल्या पक्ष्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनही या संमेलनात पाहायला मिळणार आहे. याचबरोबर पक्षीतज्ज्ञ नसले तरी जे पक्षीमित्र आहेत किंवा जे उत्तम निरीक्षक आहेत, त्यांना आपले निवडक प्रेझेंटेशन सादर करता येणार आहे. दोन दिवसीय संमेलनातील एका दिवशी नेचर ट्रेलचा आनंदही पक्षीमित्रांना घेता येणार आहे. राज्यस्तरीय अशा या संमेलनात ठाणे, मुंबई , रायगडसह विविध जिल्हयातील मिळून सुमारे ५०० पक्षीमित्र सहभागी होण्याची शक्यता आयोजक असलेल्या होप संस्थेने वर्तविली आहे. यापूर्वीही एकदा ठाण्यात राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलन भरले होते आणि विशेष म्हणजे तेही होप संस्थेनेच आयोजिले होते.ठाणे खाडीत फ्लेमिंगो सेंच्युरीठाणे खाडीत वर्षभरात सुमारे २०० प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. परंतु येथील फ्लेमिंगोंचे सर्वांनाच कायम आकर्षण असते. ठाणे खाडीला अलीकडेच ‘फ्लॅमिंगो सेंचुरी’ म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे फ्लेमिंगो तसेच इतर काही नवीन पक्ष्यांसाठी स्थळ म्हणूून ठाणे खाडीचा पर्याय योग्य आहे