कल्याण : नेवाळी येथील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मुद्यावर गुरूवारी मंत्रालयात बैठक घेतली जाणार आहे. कल्याण, भिवंडी व मुरबाडच्या दौºयावर आलेले सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी आमदार गणपत गायकवाड यांनी रविवारी नेवाळीच्या प्रश्नावर चर्चा केली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.चंद्रकांत पाटील हे रविवारी दौरा आटोपून कल्याण कल्याण रेल्वेस्थानकावर आले असता, त्यांनी फलाटावर प्रवाशांशी चर्चा केली. यावेळी आमदार गणपतराव गायकवाड हेदेखील उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील कुशीवली धरणाचा प्रलंबित प्रश्न पाटील यांच्यासमोर मांडला. ब्रिटिशांनी दुसºया महायुद्धाच्यावेळी नेवाळी परिसरातील शेतकºयांची १७५० हेक्टर जमीन घेतली होती. ती अद्याप परत केली नसल्याने, त्यासाठी तीव्र आंदोलन झाल्याचे गायकवाड यांनी सांगितले. त्यावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी आ. गायकवाड यांना पाटील यांनी मंत्रालयात पाचारण केले आहे.तत्पूर्वी, एका गृहप्रकल्पातील सदनिकाधारकांना चाव्या वाटपाचा कार्यक्रम पाटील यांच्या हस्ते रविवारी पार पडला.रस्त्यांवरील खड्ड्यावरुन पाटील यांना लक्ष्य केले जात असताना पाटील यांनी त्यांच्या भाषणात याच मुद्याला हात घातला. शहरी, ग्रामीण आणि राज्य व राष्ट्रीय महामार्गाची विकासकामे केली जात आहेत. २०२२ पर्यंत रस्ते विकासाचे चित्र पूर्णपणे बदलेल. रस्ते तयार करणाºया कंत्राटदार कंपनीलाच देखभाल, दुरुस्तीचे तीन ते पाच वर्षांचे दायित्व दिले जाणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.>वाहतूककोंडीचा फटकाकल्याण-डोंबिवलीत भाजपाचे चार आमदार असले तरी, कल्याणमधील वाहतूककोंडीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. कल्याण, भिवंडी व मुरबाडच्या दौºयावर आलेले बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना या वाहतूककोंडीचा फटका रविवारी बसला. शासकीय विश्रामगृहाकडे जाताना येथील प्रचंड वाहतूककोंडीमुळे त्यांनी वाहनांचा ताफा बाजुला ठेऊन पायी जाणेच पसंत केले.>मंत्री असण्याचे फायदेमंत्र्यांचा दौरा असला, की सरकारी यंत्रणा कामाला लागते. रस्ता तयार करण्याची सूचना नसेल, तरीही रस्ता तयार केला जातो. कल्याण पडघा रोडपासून चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमस्थळापर्यंतचा सिमेंंट कॉन्क्रीटचा अरुंद रस्ताही तयार करण्यात आला.संबंधित गृहप्रकल्पाच्या विकासकाने सांगून हा रस्ता तयार करून घेतला. हा रस्ता खासगी गृहप्रकल्पासाठी असला, तरी त्याच रस्त्यावरुन मंत्री प्रकल्पाच्या ठिकाणी येणार असल्याने तो तयार करण्यात आला. मंत्री असण्याचे फायदे असतात, रस्ता तयार होतो, असे पाटील यावेळी म्हणाले.