सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका निवडणूक पाश्वभूमीवर शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांची गोलमैदान येथील खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयात गुरवारी रात्री पार पडली. बैठकीला शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नेते धनंजय बोडारे, अरुण अशान तर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष पंचम कलानी, ओमी कलानी, मनोज लासी आदीजन उपस्थित होते.
उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेली महाविकास आघाडी एकत्रपणे उतरतील अशी आशा शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी यापूर्वी दिली होती. मात्र गुरवारी गोलमैदान येथील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयात निवडणूक पाश्वभूमीवर शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्याच्या निवडणुकी बाबत प्राथमिक चर्चा झाली. काँग्रेस पक्षाच्या बैठकीला बोलावले नसल्याने, शहर महाविकास आघाडीत बिघाडी झाली काय? अशी चर्चाही झाली. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नेते धनंजय बोडारे, अरुण अशान, नगरसेवक कलवंत सिंग बिट्टू, तर राष्ट्रवादी पक्षाकडून शहाराध्यक्षा पंचम कलानी, ओमी कलानी, नगरसेवक मनोज लासी, सुमित चक्रवर्ती, युवानेते कमलेश निकम आदीजन बैठकीला उपस्थित होते. शहर विकास कामे आदी बाबत प्राथमिक चर्चा बैठकीत झाल्याची माहिती बोडारे यांनी दिली.
महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने महापालिका निवडणुकीत एकलो चलोची भूमिका घेतल्याने, काँग्रेस पक्ष नेत्यांना बैठकीला बोलाविले नसल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. मात्र निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहावी, असे पक्ष नेत्यांचे व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. असेही चौधरी म्हणाले. तर काँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी महापालिका निवडणुकी बाबत एकलो चलोची भूमिका पक्ष नेतृत्वाची असलीतरी, तसे आदेश प्रत्यक्षात आले नाही. पक्षाच्या भूमिकेनुसार महापालिका निवडणुकीत ध्येय धोरणे घेतले जाणार असल्याचे साळवे म्हणाले. महापालिकेत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षातील गंगोत्री गटाला बोलाविले नसल्याची चर्चाही शहरात रंगली आहे.