शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
3
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
4
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
5
हिमेश रेशमियाला पितृशोक, गायकाच्या वडिलांचं ८७व्या वर्षी निधन
6
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
8
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
9
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
10
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
11
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
12
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
13
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
14
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
15
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
16
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
17
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
18
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
19
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
20
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई

‘महा-हब’चे घोंगडे भिजत पडले ; नव उद्योजकांसाठीच्या प्रकल्पाला फक्त मान्यताच, अद्याप कार्यवाही नाही

By सुरेश लोखंडे | Published: September 17, 2024 7:12 AM

५०० काेटी खर्चाचा हा प्रकल्प कल्याण तालुक्यातील मौजे अंतरली, खोणी येथे उभारण्यात येणार होता. 

सुरेश लाेखंडे

ठाणे : राज्यात नावीन्यपूर्ण नवउद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘महा-हब, इनक्युबेटर आणि इनोव्हेशन सेंटर’ ठाणे जिल्ह्यात स्थापन करण्याचा गतवर्षी राज्य शासनाने घेतलेला निर्णय आजही धूळ खात पडून आहे. ५०० काेटी खर्चाचा हा प्रकल्प कल्याण तालुक्यातील मौजे अंतरली, खोणी येथे उभारण्यात येणार होता. 

राज्यभरातील नवउद्याेजकांच्या हितासाठी हा महा-हब प्रकल्प उपयुक्त ठरणारा असून, त्यासाठी  ठाणे, नवी मुंबई या महानगरांच्या सीमेवर कल्याण तालुक्यात हे ‘महा-हब, इनक्युबेटर आणि इनोव्हेशन सेंटर’ स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली. २५ हेक्टरवर उभारण्यात येणारे हे सेंटर नव उद्याेजकांना लागणारी आर्थिक मदत, मार्गदर्शन आणि प्रशिक्षणासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडणार होते. कंपनी कायद्यानुसार ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर चालणारी कंपनी स्थापन करण्यासाठी शासनाने सहमती दिली होती.  

अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती कधी ?

 कंपनीवर विविध क्षेत्रांतील नऊ संचालक नियुक्त करणार होते. या संचालकांमध्ये उद्योग, खासगी इक्विटी फंड या क्षेत्रातील कंपन्यांचे चार संचालक असणार होते. या संचालकांचे प्रत्येकी १० कोटींचे याेगदान निश्चित केले होते.

 आयआयटी-बी, एनएलयू-मुंबई, आयआयएम-मुंबई या तीन प्रीमियम शैक्षणिक संस्थांचे वरिष्ठ पातळीवरील अधिष्ठाता एकूण तीन संचालक, प्रधान सचिव, आदींसह या कंपनीसाठी तज्ज्ञांची कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य इनोव्हेशन अधिकारी, व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती करण्यात येणार होती. मात्र, या महा-हबचे सध्या भिजत घाेंगडे आहे.

९९ वर्षांच्या कराराचे काय झाले ?

 खोणी येथील २५ हेक्टर अतिक्रमणमुक्त गायरान जमीन ९९ वर्षांच्या कराराने हस्तांतरित करण्याची कार्यवाही झालेली नाही. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रस्तावित २५ हेक्टर जागेतील पहिल्या टप्प्यात सहा लाख चौ. फुटांचे बांधकाम करण्याचे नियोजन होते.

 माहिती तंत्रज्ञान विभाग हा नोडल विभाग म्हणून काम पाहणार, तर उद्योग विभाग व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ हे आवश्यक ते साहाय्य करणार असे ठरले होते.

महा-हब प्रकल्पाच्या नवीन संचालक नियुक्तीसाठी त्यांचा शोध सुरू आहे. प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे सर्वेक्षणही सुरू आहे. बरीचशी अन्य कामेही मार्गी लागली आहेत.

- रोहन घुगे, सीईओ, जि. प.ठाणे