डोंबिवली : मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणे अप जलदसह हार्बरच्या वाशी-बेलापूर स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक होता. हे ब्लॉक सकाळी ११ ते दु. ३.४० या वेळेत होते. या ब्लॉकमुळेच दादर-रत्नागिरी गाडी दिवा स्थानकापर्यंतच सोडण्यात आली व तेथूनच ती परत रत्नागिरीला पाठविणयात आली.या ब्लॉकमुळे मुख्य मार्गावरील कल्याण-ठाणे अप जलदची वाहतूक अप धीम्या मार्गावर वळवण्यात आल्याने सकाळच्या वेळेत अप जलदवर लोकल न धावल्याने अप धीम्या मार्गावरील ठिकठिकाणच्या स्थानकांमध्ये रविवार असूनही तुलनेने जास्त गर्दी झाली होती. डाऊन मार्गावरील दोन्ही दिशांची वाहतूक सुरळीत होती. रत्नागिरी-दादर ही पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंतच धावली. ही गाडी दिव्यापर्यंतच धावल्याने, त्यातून आलेल्या शेकडो प्रवाशांना त्या स्थानकातून पुन्हा लोकल पकडण्यासाठी धावपळ करावी लागली. त्यामुळे कुटुंबासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास झाला. हार्बरच्या वाशी-बेलापूर मार्गावर स. ११ ते दु. ३ या वेळेत ब्लॉक असल्याने या कालावधीत त्या स्थानकांदरम्यान अप-डाऊनच्या लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या मार्गावर जाणाऱ्या दोन्ही मार्गांवरील प्रवाशांची पंचाईत झाली. ट्रान्स-हार्बरच्या ठाणे-पनवेल मार्गावरील गाड्याही त्या वेळेत रद्द होत्या. प्रवाशांच्या सोईसाठी ठाणे-नेरूळ, पनवेल-बेलापूर आणि सीएसटी-वाशी मार्गावर विशेष लोकल सोडण्यात आल्या होत्या.
मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल
By admin | Published: November 16, 2015 3:37 AM