भिवंडी: आजच्या महिला अबला नसून त्यांच्यात भरपूर कौशल्य आहे. परंतु पुरु ष प्रधान संस्कृतीमध्ये महिलांना आजही अपेक्षित स्वातंत्र्य पुरूषांनी दिलेले नाही. अनेक प्रगतीशील महिलांचे आवाज या संस्कृतीमध्ये पुरु षांनीच दाबल्याची उदाहरणे आपण बघतो. त्यामुळेच सबला असणाऱ्या महिलांचे खºया अर्थाने सबलीकरण करायचे असेल, तर आधी पुरु षांचे प्रबोधन करण्याची गरज आहे, असे मत भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले.तालुक्यातील पिंपळास ग्रामपंचायत हद्दीत भूमी वर्ल्ड कॉम्प्लेक्समध्ये कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन खासदार पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संतोष थिटे आदी उपस्थित होते. वस्त्रोेद्योग मंत्रालयातंर्गत एईपीसी पुरस्कृत एटीडीसी, जिल्हाधिकारी आणि भूमी वर्ल्ड यांच्या वतीने कौशल्य विकास केंद्र उभारण्यात आले आहे.पाटील म्हणाले की, महाराष्ट्राला थोर स्त्रियांची मोठी परंपरा लाभली आहे. राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी अशा महिलांनी महाराष्ट्राच्या भूमीत कार्य केले. नवरात्रीत नऊ दिवस फक्त उत्सव साजरा करतो. पण एरव्ही महिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. आता राजकीय क्षेत्रातही महिलांना आरक्षण मिळाल्याने त्यांना विविध पदेही मिळाली. त्यामुळेच महिलांना सर्व क्षेत्रात मुक्तपणे भरारी घेण्यासाठी सर्व पुरु षांनीच पुढाकार घायला हवा. तरच खºया अर्थाने महिलांची प्रगती होऊ शकेल, असे ते म्हणाले.
पुरुषांचे प्रबोधन करणे गरजेचे - पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:44 AM