ठाणे : म्हाडामध्ये अल्पदरात घर मिळवून देण्याच्या नावाखाली सव्वा लाखाची फसवणूक करणाऱ्या निशांत गुळंबे (३०, रा. मुंबई) याला नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.म्हाडामध्ये घर मिळवून देतो, अशी बतावणी करून नौपाड्यातील प्रतिमा गायकवाड यांच्याकडून निशांत याने एक लाख २५ हजारांची रक्कम घेतली होती. मात्र, त्याने ती म्हाडा कार्यालयात न भरता प्रतिमा यांची फसवणूक करून ते पैसे स्वत:च्याच फायद्यासाठी वापरले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गायकवाड यांनी याप्रकरणी १४ डिसेंबर २०१९ रोजी फसवणुकीचा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केला होता. त्याने प्रतिमा यांना चुकीचा पत्ता दिलेला होता. मात्र, तांत्रिक माहिती तसेच खबºयाने दिलेल्या माहितीच्या आधारे १७ डिसेंबर रोजी निशांतला सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे यांच्या पथकाने अटक केली. या कामगिरीसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले.आणखी चार तक्रारी दाखलआरोपीने अशाच प्रकारे म्हाडामध्ये अल्पदरात घर घेऊन देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याची बाब उघड झाली आहे. त्याने फसवणूक केल्याच्या आणखी चार तक्रारी दाखल झाल्याचेही नौपाडा पोलिसांनी सांगितले. ज्यांची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल, त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे आवाहन नौपाडा पोलिसांनीकेले आहे.