शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

ठाण्यात १.४० लाख नळजोडण्यांना मीटर; १३१ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 12:08 AM

पाणीगळती आणि पाणीचोरी रोखण्यासाठी तसेच पाण्याच्या बिलांची योग्य प्रकारे वसुली व्हावी, या उद्देशाने प्रथम हायटेक स्वरूपाचे परदेशी तंत्रज्ञानाचे मीटर बसवण्याचे पालिकेने निश्चित केले होते

ठाणे : आधी हायटेक, नंतर स्मार्ट आणि त्यानंतर पुन्हा सेमी ऑटोमेटिक मीटर अशा पद्धतीने मागील १२ वर्षे पालिकेने नळजोडण्यांना मीटर बसवण्यासाठी विविध निविदा काढल्या होत्या. परंतु, अखेर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आता हे मीटर बसवण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार, तब्बल एक लाख ४० हजार जोडण्यांवर ते बसवले जाणार असून आतापर्यंत पाच हजारांहून अधिक मीटर बसवले गेले आहेत. यासाठी १३१ कोटींचा खर्च केला जाणार आहे. स्मार्ट मीटरमुळे आता ठाणेकरांना खऱ्या अर्थाने पाण्याचे महत्त्व समजणार आहे. या उपाययोजनेमुळे पाणीगळती आणि चोरीस अंकुश बसणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

पाणीगळती आणि पाणीचोरी रोखण्यासाठी तसेच पाण्याच्या बिलांची योग्य प्रकारे वसुली व्हावी, या उद्देशाने प्रथम हायटेक स्वरूपाचे परदेशी तंत्रज्ञानाचे मीटर बसवण्याचे पालिकेने निश्चित केले होते. यासाठी ३५ कोटींचा निधी खर्च केला जाणार होता. परंतु, तत्कालीन आयुक्त आर.ए. राजीव या योजनेविषयी साशंक होते. नंतर, आलेले आयुक्त असीम गुप्ता यांनी ही योजनाच गुंडाळली होती. दरम्यान, पुन्हा एआरएमचे सेमी आॅटोमेटिक मीटर बसवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला होता. त्यानुसार, या कामासाठीच्या निविदा मागील वर्षी मागवून पीपीपी तत्त्वावर हा निर्णय राबवण्याचे ठरले होते. परंतु, या योजनेच्या निविदेला वारंवार मुदतवाढ देऊनही प्रतिसाद मिळालेला नाही. अखेर, या कामासाठी आता स्मार्ट सिटीतून १३१ कोटींचा खर्च केला जाणार आहे. त्यानुसार, मागील काही दोन ते महिन्यांपासून शहरातील विविध भागांत अशा प्रकारे स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामाला निविदा मागवून सुरुवात झाली आहे. त्यानुसार, आतापर्यंत पाच हजारांहून अधिक मीटर बसवले आहेत. या कामासाठी स्मार्ट सिटीअंतर्गत ९३ कोटींचा खर्च केला जात असून पुढील निगा आणि देखभालीसाठीचा पाच वर्षांचा खर्च हा पालिका करणार आहे. यासाठी खाजगी एजन्सीची नेमणूक केली आहे. मीटर लावल्यानंतर लिटरप्रमाणे कर आकारणी केली जाईल. त्यामुळे पाण्याचे बील महागण्याची शक्यता आहे. परंतू पाणी जपून वापरल्यास नागरिकांचा फायदाच होणार आहे.

असे आहेत स्मार्ट मीटरया स्मार्ट वॉटर मीटरमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करता येणार नाही. डिजिटल स्वरूपाचे हे मीटर असून ते अनब्रेकेबल आहेत. शिवाय, याचे रीडिंगसुद्धा घरोघरी न जाता एकच व्यक्ती एखाद्या भागात उभी राहिल्यास ब्ल्यूटूथच्या साहाय्याने त्याच्या हातात असलेल्या रीडिंग मशीनमध्ये त्या भागातील सुमारे १०० मीटरचे रीडिंग एकाच वेळेस घेऊ शकणार आहे.

ग्राहकांना होणार फायदाया मीटरमुळे ग्राहक जेवढे पाणी वापरणार आहेत, तेवढेच बिल त्यांना भरावे लागणार आहे. पूर्वी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून झोपडपट्टी भागासाठी १३० रुपये याप्रमाणे बिल आकारले जात होते. त्यानुसार, कुटुंबातील पाच व्यक्तींनुसार ४५० लीटर पाणी हे दरवर्षी वापरले जाते, असा अंदाज आहे. त्यानुसार, महिन्याचे बिल त्या कुटुंबासाठी मीटरप्रमाणे १०० ते ११० पर्यंत येऊ शकणार आहे. परंतु, जास्त पाणी वापरल्यास जास्तीचे बिल येणार आहे.

या दरानुसार येणार बिलपूर्वी इमारतींसाठी महिना १८० रुपये आणि बैठ्या चाळींसाठी १३० च्या आसपास पाणीआकार घेतला जात होता. परंतु, आता स्मार्ट मीटरचा दर हा पालिकेने निश्चित केला आहे. शून्य ते १५ हजार लीटरपर्यंत ७.५० रुपये, १५ हजार ते २० हजारपर्यंत १० रुपये, २० हजार ते २४ हजार पर्यंत १५ रुपये आणि २४ हजारांच्या पुढे २० रुपये असा दर हजार लीटरमागे आकारला जाणार आहे.