म्हारळ : म्हारळ गावात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत असून, चार दिवसांत २७ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यात तिघे रुग्ण हे वरप येथील आहेत.
ठाणे जिल्ह्यातील म्हारळ ही मोठी ग्रामपंचायतीत आहे. त्यातील लोकसंख्याही मोठी आहे. तेथे कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असताना मात्र ग्रामपंचायतीकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दुकानांमध्ये कोणतेच नियम पाळले जात नाहीत. ग्रामस्थही विनामास्क फिरताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोना पसरण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, म्हारळ येथे दर शुक्रवारी अँटीजेन चाचण्या केल्या जात आहेत. रुग्णांना घरी विलगीकरणात ठेवण्याशिवाय ठाणे येथे शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येत आहे, असे दहागाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश राठोड यांनी सांगितले. भिवंडी तालुक्यातील सवाद येथे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे कल्याण ग्रामीण परिसरातील रुग्णांची मोठी सोय होणार आहे.
-------------------