डोंबिवली : महावितरणच्या उच्च दाबाच्या वीजवाहिनीला झाडांच्या फांद्यांचा स्पर्श होऊन आग लागण्याचे प्रकार एमआयडीसीच्या निवासी भागात वाढले असून याबाबत तक्रारी केल्यानंतरही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे व संतापाचे वातावरण आहे. या घटनांमुळे वीजपुरवठा तासन् तास खंडित होण्याचे प्रकार होत आहेत.
बुधवारी सकाळी मिलापनगर तलावाजवळील उच्च दाबाच्या वाहिनीला झाडाची फांदी लागून मोठा स्फोट झाला त्यानंतर ठिणग्या उडून आग लागली. यापूर्वीही डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात ट्रान्सफॉर्मर, केबल यांना आग लागली होती. महावितरणकडून देखभाल, दुरुस्ती योग्य होत नसल्याचे त्यांचा निदर्शनास आणून दिले होते. पोल, आधार देण्यासाठी असलेल्या स्टे वायर गंजून गेल्या आहेत. या सर्व तक्रारी स्थानिक उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे केल्या आहेत, परंतु अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याचे नागरिकांनी सांगितले. त्या घटनेमुळे मिलापनगर परिसरात सकाळपासून खंडित झालेला वीजपुरवठा दुपारपर्यंत पूर्ववत झाला नव्हता. कडक उन्हाळा, ऑनलाइन शाळा, कॉलेज, सुरू असलेल्या परीक्षा याला फटका बसत असून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी रहिवासी करत आहेत.
-------
फोटो आहे
........
वाचली