डोंबिवली : ठाणे पश्चिमेप्रमाणेच डोंबिवली पूर्वेला एकच मध्यवर्ती रिक्षास्टॅण्ड सुरू करण्यासाठी २००७ पासून आतापर्यंत पाच वेळा सर्वेक्षण झाले आहे. मात्र, हे स्टॅण्ड अद्याप कागदावरच आहे. आरटीओ अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे शहरात सर्वत्र मनमानी कारभार सुरू असल्याची टीका डोंबिवली रिक्षा-चालक-मालक संघटनेचे कोषाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी केली.
शहरात जागा मिळेल तिथे रिक्षास्टॅण्ड सुरू करण्यात आले आहेत. आरटीओ अधिकाऱ्यांनी बारीक लक्ष देऊन नियमांचे उल्लंघन करणाºया रिक्षाचालकांविरोधात कडक कारवाई करायला हवी. पण, तेथे आरटीओ अधिकारी येतच नाहीत, तर कारवाई कुठून व कधी होणार, असा सवाल त्यांनी केला. माळेकर म्हणाले की, ‘आरटीओ नियमांप्रमाणे शेअर पद्धतीनेही किमान भाडे आठ रुपयेच होत असेल, तर त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. मात्र, जे रिक्षाचालक आठ रुपये घेत नसतील, तर ती त्यांची चूक आहे. आरटीओ अधिकाºयांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. तसेच नियमबाह्य शेअर भाडे आकारणाºयांवर काय कारवाई केली, हे देखील त्यांनी स्पष्ट करायला हवे.’ ते पुढे म्हणातात की, ‘शहरातील अनागोंदी कारभाराला आरटीओ जबाबदार असून त्यांचा अधिकारी पूर्णवेळ शहरात असावा, अशी युनियनची मागणी आहे. मात्र, ती पूर्ण झालेली नाही. त्यामुळे रांगेत रिक्षा उभी न करणारे, गणवेश न घालणारे, शिस्त न पाळणाºया रिक्षाचालकांचे फावते. तसेच त्यांना कोणी लगाम घालू शकत नाही. शहरात ठिकठिकाणी आरटीओ अधिकारी, वाहतूक पोलीस अधिकारी नेमण्यापेक्षा पूर्वेला स्थानक परिसरात एकच मध्यवर्ती रिक्षास्टॅण्ड ठेवावे. याच स्टॅण्डवरून शहरातील विविध भागांत रिक्षा सोडाव्यात. एकाच स्टॅण्डमुळे शहरभर वाहतूककोंडी होणार नाही. शिवाय, त्यांच्यावर कारवाई करणे, लक्ष ठेवणे सोपे जाईल. मध्यवर्ती स्टॅण्डसाठी सर्वेक्षण झाले. मात्र, अंमलबजावणीऐवजी तो अजूनही कागदावरच राहिला आहे.’दरम्यान, रिक्षाचालकांनाही संसार आहे. महागाईचे चटके त्यांनाही सोसावे लागतात. त्यामुळे त्यांना खटवा समितीच्या निर्देशानुसार भाडेवाढ द्यावी. मीटरपद्धतीतही फेरीमागे दरआकारणीसाठी मंजुरी देण्यासाठीही आरटीओने लक्ष घालावे. ते मंजूर झाल्यास सध्या होणारे वादविवाद होणार नाहीत, संभ्रम होणार नाही. तसेच नियमांची अंमलबजावणी करणे सोपे जाईल, असेही माळेकर म्हणाले.मी नुकताच येथे आलो असून प्रभारी कार्य पदभार घेतला आहे. डोंबिवली पूर्वेसंदर्भातील हे सर्वेक्षण कधी झाले, याबाबतची मी माहिती घेतो, त्याबद्दल आताच मला काही सांगता येणार नाही. पण, रेकॉर्ड काय आहेत, त्यासंदर्भात सर्व वस्तुस्थिती काय आहे, हे मला बघावे लागेल.- जयंत पाटील, उपप्रादेशिकपरिवहन अधिकारी, कल्याण