अंबरनाथ : उल्हासनगर हद्दीतील जीन्स कारखान्यांवर कारवाई होत असल्याने आता काही कारखानदारांनी उल्हासनगरमधून काढता पाय घेत अंबरनाथमध्ये आपले प्रस्थ निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. एमआयडीसीला लागून असलेल्या रस्त्याच्या शेजारी काही कारखाने सुरू करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर जीन्स धुण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन खड्डे करून जमिनीत मुरवण्याचे काम सुरू केले आहे. या बेकायदा कारखान्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.अंबरनाथमधील काकोळे गावाला जाणाºया रस्त्यावर काही कारखाने उभारण्यात आले आहेत. या कारखान्यांत जीन्स तयार करण्यात येतात. जीन्सला रंगवण्यासाठी वापरण्यात येणारे रासायनिक पाणी नष्ट करण्यासाठी कारखान्यांच्या शेजारी मोठे खड्डे खोदण्यात आले आहे. त्या खड्ड्यांमध्ये रासायनिक पाणी टाकण्यात येते. उल्हासनगरमध्ये वालधुनी नदी प्रदूषणाच्या मुद्यावर कारखान्यांवर कारवाई करण्यात येत आहे.उल्हासनगरमधील कंपन्या अडचणीत आल्याने अनेक कारखाने आता अंबरनाथमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. पाले गाव परिसरात काही कारखाने आलेआहेत. तर, काकाळे गावाजवळ काही कारखाने स्थलांतरित झाले आहे.या ठिकाणी प्रदूषित पाणी उघड्यावर सोडण्यात येत आहे. हे कारखाने उभारताना कोणतीच परवानगी घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. तर, प्रदूषित पाणी हे थेट उघड्यावर कसे टाकले जाते, याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
जीन्स कारखान्यांचे अंबरनाथमध्ये स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 6:26 AM