शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

बाजार समितीत सेना विजयी

By admin | Published: February 16, 2017 1:58 AM

भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रणीत महाआघाडीने एकूण १८ पैकी ११ जागा जिंकत बाजी

अंबाडी : भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रणीत महाआघाडीने एकूण १८ पैकी ११ जागा जिंकत बाजी मारली. त्यामुळे येथे अनेक वर्षे भाजपा खासदार कपिल पाटील यांच्या एकहाती वर्चस्वाला धक्का बसला आहे.भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. यामध्ये कृषी व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघात एकूण ३२१ पैकी ३१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामपंचायत मतदारसंघात ११५६ पैकी ११३२ मतदारांनी मतदान केले, तर व्यापारी व आडते मतदारसंघात ११२ पैकी १०७ मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी भिवंडीतील राजया गाजेंगी सभागृहात झाली. शिवसेनाप्रणीत शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँॅग्रेस, काँॅग्रेस, श्रमजीवी संघटना, कुणबीसेना या सर्वपक्षीय महाआघाडीच्या शेतकरी विकास परिवर्तन पॅनलने एकूण १८ पैकी ११ जागा जिंकून बाजी मारली आहे. तर, खासदार पाटील यांच्या सहकार पॅनलला केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले.ग्रामपंचायत मतदारसंघात भाजपाचे संतोष जाधव व महाआघाडीच्या सुनीता भावर तसेच कृषी व बहुउद्देशीय सहकारी संस्था या मतदारसंघात भाजपाचे दयानंद पाटील व महाआघाडीचे विष्णू पाटील, तर कृषीच्याच सर्वसाधारण जागेतील सातव्या क्रमांकासाठी महाआघाडीचे अनंता भागोजी पाटील व महाआघाडीचेच मोहन मणेरा यांना एकसमान मते मिळून भाजपाचे संतोष जाधव व दयानंद पाटील, अनंता पाटील चिठ्ठीद्वारे निवडून आले. (वार्ताहर)