लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मुंबई - नाशिक पूर्व द्रूतगती मार्गावरुन मुंबईकडे निघालेल्या कांद्याच्या टेम्पोला दुधाच्या टँकरने धडक दिल्याची घटना गुरु वारी सकाळी माजीवडा उड्डाणपुलावर घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना सायन येथील लोकमान्य टिळक रु ग्णालयात दाखल केल्याची हलविण्यात आल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली.एकनाथ वाघ ( चालक) आणि सुनील जाखार अशी जखमी चालकांची नावे आहेत. दुधाचा टँकर मुंबईकडून नाशिक मार्गे तर कांद्याचा टेम्पो नाशिककडून मुंबईकडे निघाला होता. पाऊस नसल्याने दोन्ही वाहने सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जात होती. त्याचवेळी दुधाचा टँकर दुभाजकावरुन कांद्याच्या टेम्पोवर जाऊ धडकला. ठाण्यातील माजीवडा उड्डाणपुलावर लोढा कॉम्प्लेक्सजवळ ही घटना घडली. याचदरम्यान दोन्ही वाहनांमधील आॅईल रस्त्यावर पसरले. आॅईल आणि रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहनांमुळे सकाळी सव्वा सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास वाहतूक कोंडी होण्यास सुरु वात झाली. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दल, राबोडी आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांमधील जखमींना तातडीने उपचारासाठी कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. तसेच वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी अपघातग्रस्त वाहनेही क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करुन रस्त्यावर पसरलेले आॅईलचीही पाण्याच्या माऱ्याने सफाई केली. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना मुंबईच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात हलविल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली.
दुधाच्या टँकरची कांद्याच्या टेम्पोला धडक; ठाण्यात पुन्हा वाहतूक कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 4:37 PM
मुंबई - नाशिक पूर्व द्रूतगती मार्गावरुन मुंबईकडे निघालेल्या कांद्याच्या टेम्पोला दुधाच्या टँकरने धडक दिल्याची घटना गुरु वारी सकाळी माजीवडा उड्डाणपुलावर घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली.
ठळक मुद्देदोन्ही वाहनांचे चालक जखमीराबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा